Ajit Pawar And Chandrakant Patil Working For Development In Pune Chandrakant Patil Statement

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राज्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) कार्यरत आहेत. त्यातच अजित पवार यांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे लोककल्याणासाठी पुण्यात दोन्ही दादा एकत्र आहेत. त्यामुळे जनहिताचे प्रकल्पांना गती मिळत आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मागील काही दिवसांमध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant patil)यांच्यात विविध कारणांवरुन मतभेद दिसत होते. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्या चर्चा किंवा मतभेदाला पूर्ण विराम दिला आहे.  

कोथरुड मतदारसंघातील बाणेर पश्चिम, सूस- म्हाळुंगे आणि पाषाण येथील सोसायटी भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून महानगर गॅस व्यवस्था उपलब्ध व्हावी, अशी मागणी होती. त्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी  चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र नॅचरल गॅसला डीआरएस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेची जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे बाणेरमधील पाच हजार नागरिकांना महानगर गॅसची व्यवस्था उपलब्ध झाली. याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील पाटील म्हणाले की, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आग्रह आहे. त्यांच्याच प्रेरणेतून राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार काम करत आहे. त्यात आता अजित पवार यांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे जनहिताचे प्रकल्पांना गती मिळत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरात मेट्रोचं जाळं उभारलं जात आहे. डिसेंबरमध्ये विमानतळ परिसरातील मेट्रो प्रकल्प कार्यान्वित होईल. 82 पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. याशिवाय सांडपाणी शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प उभारले जात आहेत. 

पाटील पुढे म्हणाले की,‌कोथरुड मध्ये 100 आदर्श सोसायटी निर्माण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा निर्गत प्रकल्प यांसारखे उपक्रम सुरू करावेत.‌यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच, कोथरुड मधील पाचशे सोसायटींमध्ये लोकसहभागातून सॅनिटरी पॅड व्हेडिंग आणि व्हॅनिशिंग मशीन कार्यान्वित करण्यात येत असून, त्याचाही सोसायटीने लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले पुण्याचं पालकमंत्री पद जरी आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे नसलं तरीही ते पुण्यातील कामांमध्ये रस घेताना दिसत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

पुतिन यांची हत्या, कन्सरवर औषध ते कोलमडलेली अर्थव्यवस्था…; बाबा वंगा यांची 2024 साठी 7 मोठी भाकीतं!

[ad_2]

Related posts