दिवाळीच्या आठवड्यात ‘या’ राशींवर असणार लक्ष्मी कुबेराची कृपा |

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weekly Career Horoscope 6 to 12 November 2023 : दिवाळीचा हा आठवडा अतिशय खास आहे. गुरुवारपासून धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 6 to 12 november 2023 Dhanteras 2023 and diwali 2023 arthik rashi bhavishy zodiac sign)

मेष (Aries Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असणार आहे. तुम्हाला कामात यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत आता केले कष्ट भविष्यासाठी फलदायी ठरणार आहे. प्रवासातून तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होमार आहे. तर प्रेमसंबंधाबद्दल बोलायचं झालं तर परस्पर प्रेम दृढ होणार असून प्रेम जीवनात रोमँटिक वातावरण असणार आहे. मात्र कुटुंबात थोडी अस्वस्था असेल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कानावर चांगली बातमी पडले. 

शुभ दिवस : 5,9

वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या आठवड्यात सुधारणार आहे. तर कामाच्या ठिकाणी अहंकाराचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील महिला तुमच्या मदतीसाठी पुढे सरसावणार आहे.  त्यांच्या मदतीने तुम्हाला आयुष्यात सुख-समृद्धी लाभणार आहे. या आठवड्यातील प्रवास मात्र तुम्ही पुढे ढकलणे फायद्याचं ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक गिफ्ट मिळणार आहे. 

शुभ दिवस : 5, 8

मिथुन (Gemini Zodiac)

या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभ होणार आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कामाच्या ठिकाणी बाह्य हस्तक्षेपामुळे तुमचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीमुळे तुम्हाला दुःख मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील प्रवास टाळा अन्यथा, तुम्हाला त्रासदायक ठरु शकतो. आठवड्याच्या शेवटी आनंदाची बातमी मिळणार आहे. 

शुभ दिवस: 6,10

कर्क (Cancer Zodiac) 

या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभाची चांगली संधी लाभणार आहे. या आठवड्यात, प्रवासाशी संबंधित अफवांमुळे तुम्ही दु:खी होऊ शकता किंवा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवास टाळा. कुटुंबात वास्तववादी राहणे तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी,  आपल्या प्रियजनांसह एखाद्या सुंदर ठिकाणी आनंदायी वेळ घालविणार आहात. 

शुभ दिवस: 5,6,10

सिंह (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी शुभ ठरणार आहे. तुमचं प्रकल्प यशाच्या मार्गाने पुढे सरकणार आहे. या आठवड्यात तुमची अशी एखादी व्यक्ती भेटू शकते जी तुम्हाला भविष्यात मदतीस पडणार आहे. आर्थिक लाभाची शुभ वार्ता असून तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमचं प्रवास पुढे ढकला नाहीतर, तुम्हाला तो त्रासदायक ठरु शकतो. कुटुंबातील वातावरण सुधारणार आहे. सप्ताहाच्या शेवटी मन अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.

शुभ दिवस : 5, 6, 7

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ ठरणार आहे. तुमच्या सुंदर भविष्यासाठी तुम्ही ठोस निर्णय घेणार आहात. कामाच्या ठिकाणी चढ-उतार असले तरी शेवटी विजय तुमचा होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून फायदा होणार आहे. कुटुंबातील कोणाच्या तरी आशीर्वादाने जीवनात सुख-शांती येणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. या आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये खर्चासाठी परिस्थिती असून उत्साहामुळे तुम्ही जास्त खर्च करणार आहात. 

शुभ दिवस: 5,8,9,10

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आठवडा शुभ सिद्ध होणार आहे. कामाच्या ठिकाणी भविष्याचा विचार करून कामात प्रगती होणार आहे. भावनिक कारणांमुळे आर्थिक खर्च वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पाहून तुम्ही थोडे निराश होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील समस्या दूर करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. एखादी बातमी मिळाल्यावर तुम्हाला वाईट वाटू शकतं. या आठवड्यात सहली पुढे ढकला. सप्ताहाच्या शेवटीही तुमचं मन पितृपक्षाबद्दल चिंतेत राहू शकतं. 

शुभ दिवस: 7,8

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबत मान-सन्मान घेऊन आला आहे. कौटुंबिक बाबींमध्ये सर्व काही ठीक असले तरी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्येही जास्त खर्च होणार आहे. या आठवड्यातील प्रवास टाळणं योग्य ठरेल.  आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अचानक एखादं गिफ्ट मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. 

शुभ दिवस: 5,8,10

धनु (Sagittarius Zodiac)

या आठवड्यात धनु राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. जीवनात सुख-समृद्धीचे सुंदर योगायोग आहे. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या महिलेची मदत मिळेल जिने कठोर परिश्रम करून जीवनात स्थान प्राप्त केलंय. या आठवड्यात तुम्ही केलेली मेहनत भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावं लागणार आहे. तुम्हाला आनंद आणि शांतीच्या संधी मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलणं फायदेशीर ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचं मन जरा अस्वस्थ राहू शकतं. 

शुभ दिवस: 6,8

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ सिद्ध होणार आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी आर्थिक लाभाची संधी आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत खूप व्यस्त असणार आहात. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातही यश मिळणार आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्यासाठी भविष्यात तुमच्या फायद्याची ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी तुमची वाट पाहत आहे. मात्र आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

शुभ दिवस: 6,9,10

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत खूप चांगला असणार आहे. प्रेम संबंध: परस्पर प्रेम वाढविणारा असेल. तर  प्रेम जीवनात रोमँटिक क्षण व्यतित करणार आहात. प्रवासातून तुम्हाला मध्यम यश प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी भावनिक कारणांमुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आर्थिक खर्चही वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही जितकं व्यावहारिक निर्णय घ्याल तितकं तुम्ही समाधानी रहाल. 

शुभ दिवस : 6,7,9

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा चांगले परिणाम मिळणार आहे. तुम्ही नवीन ठिकाणी प्रवास करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रवासाचं सुखद परिणाम मिळणार आहेत. या आठवड्यात आर्थिक खर्च वाढणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये हळूहळू सुधारणा होईल. भावनिक कारणांमुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याबाबत मन अस्वस्थ असेल. 

शुभ दिवस : 9

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts