Wtc Final 2023 Team India Playing 11 Yet To Be Decided Ind Vs Aus Ashwin And Umesh To Play ICC World Test Championship 2023 India Vs Australia

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WTC Team India Playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 7 जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) अंतिम सामना रंगणार आहे. अंतिम सामन्याला अवघे काही दिवस उरले आहेत. पण, अद्यापही टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा पेच कायम आहे. टीम इंडियाच्या मागे आधीचं दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. अश्विन आणि उमेश यादव हे दोघेही टीम इंडियाच्या प्लेईंग 11 साठीचे प्रबळ दावेदार आहेत. पण प्लेइंग 11 मध्ये फक्त एकालाच स्थान मिळेल.

टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा पेच कायम

गेल्या काही वर्षात रवींद्र जडेजाच्या बॅटची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. अष्टपैलू जडेजा तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षकाचा पहिला पर्याय आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये अश्विनपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जडेजा खेळणार हे निश्चित आहे.

एका जागेसाठी तीन खेळाडूंमध्ये लढत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलपूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टीम इंडिया दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार की चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली जाणार हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. अश्विन, अक्षर आणि उमेश यादव हे तीन खेळाडू एका जागेसाठी लढत आहेत.

गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे टीम इंडियाचे आघाडीचे गोलंदाज असतील. शार्दुलकडे उत्तम फलंदाजी आणि चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूरही खेळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. 

अश्विनऐवजी उमेशला मिळू शकते संधी

इंग्लंडच्या खेळपट्टीवर अश्विनला संधी द्यायची की नाही यावर सारा पेच अडकला आहे. दोन वर्षांपूर्वी भारताने WTC फायनलमध्ये दोन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले होते. भारताचा हा निर्णय पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यामुळे उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता अधिक दिसत आहे. अश्विनऐवजी उमेश यादव इंग्लंडमध्ये चांगला पर्याय ठरू शकतो. अक्षर पटेलला प्लेइंग 11 स्थान मिळणं फार कठीण दिसत आहे. फलंदाजीत अक्षर अश्विनवर भारी आहे. पण गोलंदाजीच्या बाबतीत अक्षर अश्विनसमोर कुठेही टिकत नाही.

अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11 : 

रोहित शर्मा (कर्णधार), शभुमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), अश्विन/उमेश, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

WTC च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया स्क्वॉड 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन (विकेटकीपर), केएस भरत (विकेकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जायसवाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts