Manoj Jarange Criticizes Chhagan Bhujbal Maratha Reservation OBC Reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असतानाच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या संभाषणाची एक कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात, “आपण आता करेंगे या मरेंगे हेच करायला पाहिजे आणि आवाज द्यायला पाहिजे. असंही मरतंय आणि तसंही मरतंय, असे भुजबळ म्हणाले असल्याचे डाव केला जात आहे. त्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उत्तर दिले आहे. भुजबळ काय म्हणाले माहित नाही, पण आमचं ‘लड़ेंगे भी और जीतेंगे भी’ असे ठरलं असल्याचं जरांगे म्हणाले आहे. 

छगन भुजबळ यांची ऑडीओ क्लिपवर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “करेंगे या मरेंगे असे म्हणणे त्यांचा प्रश्न आहे. पण आमचं म्हणणे आहे की, ‘लड़ेंगे भी और जीतेंगे भी’ असे जरांगे म्हणाले. तर, आम्हाला अजून आरक्षण मिळालेच नाही, अजून लढा सुरु आहे. आम्ही आमच्या हक्काचे मागत असून, कोणावर अतिक्रमण करत नाही. कोण काय बोलत आहे, त्याकडे आता लक्ष न देण्याचे आम्ही ठरवले असल्याचे जरांगे म्हणाले आहे. 

[ad_2]

Related posts