Maharashtra Gram Panchayat Elections Result 2023 LIVE Complete Winning Sarpanch List Gram Panchayat Nivadnuk Nikal Full List Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Sarpanch Winner List Live : मुंबई : राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत.  सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. तर मतमोजणी उद्या होणार आहे. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे. 

सरपंचांची यादी सर्वात आधी; पाहा तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी  राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. 5 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार रडली आहे. तर आज मतमोजणी सुरु झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. तर अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पाहुयात निवडणुकीत सरपंच पदावर विराजमान झालेल्यांची यादी… 

  • राज्यातला पहिला सरपंच ठाकरे गटाचा, कोल्हापुरातील राधानगरी चांदेकरवाडीत लोकनियुक्त सरपंच सौ .सीमा हिंदुराव खोत विजयी 
  • दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीचा निकाल हाती, भाजप समर्थक आघाडीचे संपूर्ण पॅनल विजयी, सरपंच अंबिका दशरथ कोळी विजयी 
  • करमाळा तालुक्यातील गोंडारे, रामवाडी या दोन ठिकाणी आ संजय मामा शिंदे गटाचे सरपंच विजयी
  • कोल्हापुरातील राधानगरी तालुका न्यू करंजेत लोकनियुक्त सरपंच सद्दाम शिराज तांबोळी विजयी
  • कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील फराळे लोकनियुक्त सरपंचपद सतेज पाटील गटाकडे सौ सीमा संदीप डवर विजयी
  • भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींना पहिला झटका, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी ग्रामपंचायतीत काँग्रेस पॅनल विजयी, 7-2 ने काँग्रेसच्या बाजूनं निकाल, महेश पाटील विजयी 
  • कोल्हापुरात बारडवाडीत लोकनियुक्त सरपंच वसंत पांडुरंग बारड विजयी 
  • सोलापुरात ठाकरे गटानं उघडलं खातं अक्कलकोट तालुक्यातील केगांव बुद्रुकची सत्ता ठाकरे गटाकडे, श्रीशैल आहेरवाडी विजयी 

 

[ad_2]

Related posts