How to Burn Full Body Fat Naturally and Weight Loss Without Gym and Dieting at Home; या घरगुती पदार्थांमुळे वेटलॉस व चरबी जाळण्यास मदत होऊ शकते

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पॅरासिम्पेथेटिक पद्धतीने खा

पॅरासिम्पेथेटिक पद्धतीने खा

पॅरासिम्पेथेटिक पद्धतीने खाणे म्हणजे ‘हळूहळू खाणे आणि पचनावर भर देणे’. खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले झाल्यामुळे पोषक तत्व शोषण घेण्याची शरीराची क्षमता वाढते. त्यामुळे जेवताना शांत आणि आरामदायी वातावरण तयार करा. तुमच्या नेमलेल्या ठिकाणी बसा, तुमचे अन्न नीट चावून खा आणि प्रत्येक चाव्याचा आस्वाद घ्या. जेवताना फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित करा आणि टीव्ही-मोबाईल किंवा बोलण्यावर नाही कारण त्यामुळे पचनक्रिया नीट राहते.
(वाचा :- तुमच्याकडेही एकाच साबणाने अंग घासून घासून अंघोळ करतं पूर्ण कुटुंब? सत्य ऐकून हलेल मेंदूची नस, हात लावणंही सोडाल)​

विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खा

विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खा

प्रत्येक प्रकारच्या अन्नामध्ये वेगवेगळे फायबर आणि पोषक घटक असतात जे आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देतात. आपल्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा आणि प्रथिने समाविष्ट करा. विविध पदार्थ खाल्ल्याने आतडे निरोगी राहते, पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

(वाचा :- 162 किलोवर पोहचले वजन, डॉक्टर म्हणाले ‘तुझ्याकडे जास्त वेळ शिल्लक नाही’, या एका उपायाने घटवले तब्बल 90 किलो वेट)​

आपल्या पचन यंत्रणेला ओळखा

आपल्या पचन यंत्रणेला ओळखा

तुमच्या पचनावर परिणाम करणाऱ्या किंवा शरीरातील सूज वाढवणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घ्या. अनेकदा प्रक्रिया केलेले पदार्थ, रिफाइंग साखर, ग्लूटेन, दुग्धजन्य पदार्थ यांसारखे पदार्थ पचनावर परिणाम करतात. या गोष्टी खाल्ल्यावर तुमच्या शरीराची प्रतिक्रिया कशी असते याकडे लक्ष द्या. पचनाच्या समस्या निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळा.
(वाचा :- Fiber Foods For Diabetes : डायबिटीजच्या औषधांपेक्षा परिणामकारक आहेत हे 5 पदार्थ, कायम कंट्रोल राहते Blood Sugar)​

प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक पदार्थ खा

प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक पदार्थ खा

दही, केफिर, सॉकरॉट, किमची आणि कोम्बुचा यांसारखे प्रोबायोटिक पदार्थ खाल्ल्याने आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढतात, पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते. लसूण, कांदे, शतावरी आणि केळी यांसारखे प्रीबायोटिक पदार्थ खाल्ल्याने आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते आणि त्यांचे कार्य सुधारते.
(वाचा :- अंड-शिमला मिरची, डाळ-टोमॅटो, 5 जादुई Weight Loss कॉम्बिनेशन, लोण्यासारखी विरघळेल चरबी, व्हाल शेवग्यासारखे बारीक)​

तणावमुक्त राहा

तणावमुक्त राहा

सतत तणावाखाली राहिल्याने आतड्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जास्त ताणामुळे आतड्यांतील बॅक्टेरियांमध्ये गडबड होऊ शकते, सूज वाढू शकते आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी लागू शकतात. तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा, योगासने, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा नियमित शारीरिक हालचाली करत राहा.
(वाचा :- Weight loss : भूमी पेडणेकरने फक्त ही एक ट्रिक वापरून घटवले तब्बल 35 किलो वजन, म्हणाली डाएट व जिमवर विश्वास नाही)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts