Ncp Sunil Tatkare Reply To Shivsena Deepak Kesarkar On Ajit Pawar Statement Maharashtra Politics News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) जिंकणं हे आपल्या सर्वांच्या समोर एक राजकीय आव्हान आहे, त्यामुळे अजितदादांच्या (Ajit Pawar) वयावर बोलण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीवर लक्ष द्यावं असा टोला खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राज्याचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना लगावला आहे. अजित पवार यांचं वय लहान आहे, ते भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात असं दीपक केसरकर म्हणाले होते. 

सुनील तटकरे म्हणाले की, लोकसभेची निवडणूक जिंकणं हे आमच्या सर्वांच्या समोर एक राजकीय आव्हान आहे. दीपक केसरकर यांनी कुठल्या आशयाने ते वक्तव्य केलं मला माहित नाही. पण वयावर कुठलंही पद ठरत नसतं. कर्तृत्वावर पद मिळत असतात. तुमचं कर्तृत्व किती? जनसामान्यातील तुमची प्रतिमा काय? जनतेचे पाठबळ तुमच्या पाठीमागे किती? यावर त्या साऱ्या गोष्टी ठरत असतात. अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा महायुती लोकसभेत 45 प्लस कसे होईल, या गोष्टीवर सर्वांनी लक्ष केंद्रित करावे.

बीड हल्ल्याची नोंद राज्य सरकारनं घेतली (Beed Violence) 

बीड हल्ला हा पूर्वनियोजित कट असून ओबीसींची घरे जाळली, असा आरोप राज्य सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, भुजबळ साहेबांनी आज त्या ठिकाणी पाहणी केली असेल. ते वरिष्ठ नेते आहेत. दीर्घकाळ मंत्रिमंडळात ते राहिलेले आहेत. धनंजय मुंडे तिथले पालकमंत्री आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकीमध्ये त्यादिवशी त्या झालेल्या घटनेच्या बाबतीत सुद्धा एक भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. मला असं वाटते की त्या भावनेची योग्य ती नोंद राज्य सरकारने घेतलेली आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही

मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ज्या ज्या कायदेशीर त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि ते आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची खबरदारी राज्य सरकार नक्की घेईल असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं. महायुतीचं सरकार हे काम करत आहे. 

महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला

महामंडळाच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी पक्षात कोणी नाराज नाही. महामंडळाचा विस्तार कधी होईल, हे मुख्यमंत्री सांगू शकतील. महामंडळाच्या संदर्भात एक समन्वय समिती गठित करण्यात आली असून त्यात चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रतिनिधीसह आपलाही समावेश आहे. महामंडळ वाटबाबाबत आम्ही काही फॉर्म्युला ठरवलेला आहे. त्याच्या आधारावर महामंडळाचं वाटप तिन्ही पक्षाच्या सहकार्याने योग्य पद्धतीनं लवकरात लवकर केलं जाईल. 

जागावाटपाच्या संदर्भात प्राथमिक चर्चा नाही (Sunil Tatkare On Lok Sabha Election)

लोकसभेच्या 45 प्लस जागा जिंकायच्याचं आहेत. यासाठी तिन्ही मुख्य पक्ष आणि घटक पक्ष त्यांच्यात एकमत आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढवण्याचं ठरलेलं आहे. परंतु जागा वाटपाच्या संदर्भात प्राथमिक चर्चासुद्धा चर्चा अजून झालेली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts