World Cup 2023 Team India Semifinal Match Location Venue And Date Virat Kohli Rohit Sharma Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) मध्ये टीम इंडिया (Team India) ची विजयी वाटचाल कायम आहे. भारताने दक्षिण आफ्रिका (South Africa) वर दणदणीत विजय मिळवला. सलग आठ सामन्यांमध्ये विजय मिळत टीम इंडियाने उपांत्य फेरीत (World Cup Semi-Final) प्रवेश केला आहे. इतर दोन जागांसाठी सहा संघांमध्ये लढत आहे. उपांत्य फेरीतील सामने मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) आणि कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डन स्टेडिअम (Eden Garden Stadium) वर खेळवले जाणार आहेत. आता टीम इंडियाचा सेमीफायनलचा सामना मुंबईमध्ये होणार की कोलकालामध्ये जाणून घ्या.

टीम इंडियाचा सेमीफायनल सामना कुठे होणार?

टीम इंडियाने विश्वचषक 2023 मध्ये गट टप्प्यातील सलग आठ सामन्यांमध्ये विजय मिळवत पॉईंट टेबल अव्वल स्थान निश्चित केलं आहे. विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना मुंबईत होणार आहे. पण, जर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आणि चौथ्या स्थानावर राहिला तर टीम इंडियाच्या सामन्याचं ठिकाण बदललेल.

पाकिस्तानमुळे उपांत्य फेरीच्या सामन्याचं ठिकाण बदलू शकतं

पहिल्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी होईल. पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या तीन संघामध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे. पाकिस्तान संघ पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यास यशस्वी ठरला तर, उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना भारताशी होईल. अशी परिस्थिती निर्माण झाली तर उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

आयसीसीचा मोठा निर्णय 

2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका खेळण्यावरही बंदी घालण्यात आली होती आणि पाकिस्तानी खेळाडूंना मुंबईत उतरण्यास बंदी घालण्यात आली होती. यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीलाच ठरलं होतं की, जर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर पाकिस्तान संघ पॉईंट टेबलमध्ये कोणत्याही स्थानावर असला तरीही त्यांचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होईल, मग .

महत्त्वाच्या इतर बातम्या  : 

[ad_2]

Related posts