Andhasraddha Nirmulan Samiti Challenge Just To Get Media Attention Said Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे (Dhirendra Krishna Shastri) राज्यात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून (Andhasraddha Nirmulan Samiti) विरोध झाला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) त्यांच्या कार्यक्रमाला देखील अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून विरोध करण्यात येत आहे. तुमच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करा असे आव्हान सतत अंनिसकडून देण्यात येत असून, आता पुन्हा असेच आव्हान देण्यात आले. यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची प्रतिक्रिया आली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्हान फक्त माध्यमांमध्ये चर्चेत येण्यासाठी असते, असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते. 

दरम्यान, यावेळी बोलतांना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, “अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने वारंवार दिले जाणारे आव्हान निव्वळ प्रसार माध्यमांमध्ये येण्यासाठी आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर या ठिकाणी आपण यापूर्वी सात ते दहा दिवस कथा सोहळा घेतला आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यासंदर्भातील ज्या काही अक्षेपार्ह गोष्टी असतील त्या प्रत्यक्ष भेट घेवून चर्चील्या जाव्यात. छत्रपती संभाजीनगर शहरात मी तीन दिवस आहे. या काळात त्यांनी चर्चेसाठी यावे, असे प्रतीआव्हानही त्यांनी यावेळी दिले. तसेच मी गेल्यावर आम्ही आव्हान दिले आणि बाबांनी ते स्वीकारले नसल्याचे सांगितले जाते,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. 

हिंदूराष्ट्र निर्मितीची मागणी होत आहे…

हिंदूराष्ट्र निर्मितीवर देखील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भाष्य केले आहे. 2010 पर्यंत देशात हिंदू शब्द उच्चारण्याची भीती वाटत होती. आता सनातन धर्माबद्दल चेतना निर्माण झाली आहे. सामाजिक समरसता, विश्वशांती, राष्ट्रभक्ती म्हणजे हिंदू धर्म ही व्याख्या आता देशवासीयांमध्ये रुजली आहे. त्यामुळे आता हिंदूराष्ट्र निर्मितीची मागणी होत असल्या दावा शास्त्री यांनी केला. मुस्लिम बांधवांचा बाप हिंदू आहे त्यामुळे त्यांनीही हिंदुधर्मात येवून घरवापसी करावी असे आवाहन त्यांनी केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणाची चिठ्ठी निघार या प्रश्नावर त्यांनी सावध पवित्रा घेत कोणत्याही बाबांच्या जीवावर राजकारण्यांना निवडणुका जिंकता येणार नाहीत. त्यामुळे राजकाण्यांच्या विजयाची चिठ्ठी आपण काढत नाहीत. त्यांनी जनतेला बाबा बनवून जिंकावे असे मत त्यांनी व्यक्त केले. 

आरक्षण दिलं पाहिजे…

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावरही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भाष्य केले. देशाच्या विचित्र युद्धकाळात मराठ्यांनी निधड्या छातीने पुढे जावून योगदान दिले आहे. पूर्वकालापासून हा समूह लढावू म्हणून परिचित आहे. त्यामुळेच त्यांच्या लढ्याला बळ प्राप्त झाले असून राज्य सरकारने त्यांच्याशी चर्चा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला पाहीजे, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे; पाठिंबा दर्शवत बागेश्वर धाम बाबांनी थेट कारणंच सांगितलं

[ad_2]

Related posts