Pune Lalit Patil Drug Case Sasoon Hospital Drugs Racket Report Yet To Disclose Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : 2 ऑकटोबरला ड्रॅग माफिया ललित पाटील (Lalit Patil Drug Case) पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital Drug Racket) पळून गेल्यानंतर 12 ऑकटोबरला ससूनच्या व्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र पंचवीस दिवस उलटल्यानंतर देखील या समितीचा अहवाल उघड करण्यात आलेला नाही. त्यामुळं ललित पाटीलला वाचवण्याचे प्रयत्न खालपासून वरपर्यंत होतायत का असा प्रश्न विचारला जातोय. 

नेमकं काय घडलं?

– 2 ऑकटोबरला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाला . 
– लगेच दुसऱ्या दिवशी बंदोबस्तावरील नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना नीलनबीत करण्यात आलं . 
– 15 ऑकटोबरला ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी बेंगलोरमधून अटक केली . 
– मुंबईत आणल्यावर ललित पाटीलने आपण पळालो नसून आपल्याला पळवून लावल्याचा आरोप केला .

अजून अहवाल उघड झाला नाही  

ललित पाटीलला पळवून लावणारे कोण आहेत याचा उलगडा आजतागायत होऊ शकलेला नाही. कारण या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीचा अहवालच अजून उघड करण्यात आलेला नाही.

डॉ. दीपक म्हैसेकर यांनी त्यांचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे सोपवून आठवडा उलटलाय. मात्र या अहवालात नक्की काय आहे हे अजून उघड झालेलं नाही. हा अहवाल गोपनीय आहे आणि तो आपण या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवू असं म्हणत दिनेश वाघमारे यांनी म्हटलंय. तर आपण याची माहिती घेऊ असं नेहमीच्या पठडीतलं उत्तर हसन मुश्रीफ यांनी दिलंय.

डीननेच पत्र लिहिल्याचं उघड 

दुसरीकडे ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी सासूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर हे स्वतः ललितला वेगवेगळे आजार असल्याचं येरवडा कारागृहाला पत्र लिहून कळवत असल्याचं एबीपी माझाने वेळोवेळी उघड केलं. मात्र तरीही न डॉ. ठाकूर यांच्यावर कोणती कारवाई झाली ना ससून बाबतचा अहवाल अद्यापपर्यंत समोर आलाय .  

ललित पाटीलमुळे ससूनमध्ये राजरोसपणे चालणारे गैरप्रकार चव्हाट्यावर आले. ललित पाटील सारखे नऊ नामचीन आरोपी ससून रुग्णालयात उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून असल्याच समोर आलं. मात्र तरीही या आरोपनीं महिनोंमहिने उपचारांच्या नावाखाली पोसणारे डॉक्टर कोण हे मात्र समोर येऊ शकलं नाही. 

ससूनमध्ये गुन्हेगारांना पोसणारी यंत्रणा कार्यरत

ससूनमध्ये गुन्हेगारांना पोसणारी यंत्रणा वर्षानुवर्षे काम करत असल्याचं एनेकदा उघड झालंय. सासूनचे डीन बदलले, राज्याचे आरोग्यमंत्री बदलले तरी ससूनमधील या यंत्रणेला काहीच फरक पडत नाही. त्यामुळं ललित पाटील प्रकरणाच्या निमित्तानं गुन्हेगारांना मदत करणारी ही यंत्रणा उखडून टाकण्याची संधी वैद्यकीय शिक्षण विभागाला प्राप्त झालीय. पण हा विभाग गोपनीयतेच्या नावाखाली हे संधी दवडताना दिसतोय. 

आरोपी अटक होऊन तुरुंगात गेले की अनेकदा त्यांच्यात सुधारणा होण्याऐवजी ते अट्टल गुन्हेगार बनतात. कारण  इतर नामचीन गुंडांच्या संपर्कात येऊन गुन्हेगारी विश्वाचे अनेक रस्ते तुरुंगातूनच त्यांच्यासाठी उघडले जातात. पुण्यात हे काम ससूनच्या सोळा नंबर वॉर्डमधून होत होतं. पण गोपनीयतेच्या नावाखाली ससूनमधील संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? पण अशाने पुढच्या काळात आणखी ललित पाटील निर्माण होण्याचा धोका आहे.

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts