Nashik Latest News Onion Inspection By Central Team In Chandwad Nashik District Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : ‘हेक्टरी लाख रुपये खर्च करून कांदा लागवड करायची, पण कांदा उत्पादनच होत नसल्याने हाती एक रुपया पडणे देखील मुश्किल झाले आहे. अशातच दुष्काळी परिस्थितीमुळे (drought) पिके घेणे अवघड झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी नाशिकच्या (Nashik) शेतकऱ्यांनी करत केंद्रीय पथकासमोर अडचणींचा पाढा वाचला. 

देशांतर्गत कांद्याला असलेली मागणी (Onion Issue) व त्या तुलनेत कमी होणारा पुरवठा तसेच कांदा दरात (Onion Rate) सातत्याने होत असलेले चढ उतारामागे नेमके कारण काय? हे शोधण्यासाठी आज नाशिकच्या (Nashik) चांदवड तालुक्यातील दुगाव येथे केंद्रीय पथकाने पाहणी केली. या पाहणीत त्यांनी थेट शेताच्या बांधावर जात कांदा पिकांची सद्यस्थितीत असलेली अवस्था बघितली. केंद्र सरकाराच्या कांदा विरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा हा शेतकऱ्याचा नसून  व्यापाऱ्यांचा आहे. कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना सबसिडी देण्याची मागणी तसेच दुष्काळी परिस्थितीसह अनेक व्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पथकासमोर मांडल्या. 

केंद्र सरकारच्या (Central Government) कांदा विरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हेक्‍टरी लाख रुपये खर्च करून कांदा लागवड करायची, पण कांदा उत्पादन होत नसल्याने साधा एक रुपयाही हाती पडणे  मुश्किल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. देशांतर्गत कांद्याला असलेली मागणी आणि दरांमध्ये होत असलेले चढ उतार या पाठीमागे नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी नाशिकच्या चांदवडमध्ये केंद्रीय पथकाने पाहणी केली आहे. यावेळी दुष्काळी परिस्थितीसह शेती पिकांना मिळणाऱ्या दराबाबत व्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पथकासमोर मांडल्या. नाशिक जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने केंद्राच्या एका पथकाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) तालुक्यातील दुगाव येथे हजेरी लावली. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची शेतीची पाहणी तसेच व्यथा जाणून घेतल्या. 

केंद्राला पाहणीचा अहवाल पाठविला जाईल….  

कांद्याची तर परिस्थिती फार गंभीर असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, दुष्काळाची परिस्थिती दूर करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. आज जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती असून काही ठिकाणी तर टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरूच आहे. शेतीची देखील बिकट परिस्थिती असून अपुऱ्या पावसात जीवाचं रान करून कांदा पिकवला, मात्र सातत्याने यात चढ उतार होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. एकंदरीत दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने केंद्रीय पथकाने नाशिकच्या काही भागांमध्ये दौरा करत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक सुभाषचंद्र मिना व कृषी मंत्रालयाचे सहआयुक्त बी.के.पोष्टी यांच्यासह उपस्थित अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत केंद्राला तसा अहवाल पाठविण्यात येईल असे सांगितले.

इतर महत्वाची बातमी : 

[ad_2]

Related posts