Madhya Pradesh Election 2023 Liquor Ban In The Border Areas Of Buldhana District Collector Order Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Madhya Pradesh Election 2023: मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी (Elections 2024) येत्या सतरा आणि अठरा तारखेला मतदान आहे. त्यामुळे या निवडणुका निर्भय आणि निरपेक्ष वातावरणात व्हाव्यात, म्हणून आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशच्या (MP Assembly Election Schedule)  सीमावर्ती भागांत आणि सीमेच्या दोन्ही बाजूंनी पाच किमी अंतरावर बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदी लागू केली आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी करून कडक पहारा देण्यात येत आहे. या परिसरात कुणीही दारू बाळगू नये, अथवा विक्री करू नये, असे स्पष्ट आदेश आज जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. 

बुलढाण्यातील सीमेवर कडेकोट बंदोबस्त

येत्या काळात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा झाल्या करण्यात आल्यात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका देशात पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जात आहे. येत्या 17 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका  पार पडणार आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांनी आता चेकपोस्ट उभारले आहेत. राज्य सीमेवर प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. मध्यरात्री एबीपी माझानं राज्य सीमेवरील चेकपोस्टचा रिअॅलिटी चेक केला. 

येत्या काळात मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात इतर राज्यातून अवैध दारू किंवा पैसा येऊ नये म्हणून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त चेकपोस्ट राज्य सीमेवर उघडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची या चेकपोस्टवर नोंद घेऊन कडक तपासणी करण्यात येत आहे. 

मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील पाच वर्ष राज्यावर कोण राज्य करणार? 5 कोटी 60 लाख 60 हजार 925 मतदार याचा निर्णय घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सुमारे तीन-चार महिने आधी होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही 2024 पूर्वीची लिटमस टेस्ट मानली जात आहे. आगामी मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत. मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर सर्व पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत.   

[ad_2]

Related posts