Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 9th November 2023 Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? आज निवडणूक आयोगात सुनावणी; निकाल की पुन्हा नवी तारीख? याकडे लक्ष

Maharashtra NCP Crisis : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडामुळे उभी फूट पडली आणि राज्याचं राजकारम पुरतं ढवळून निघालं आहे. अजित पवार थोरल्या पवारांची (Sharad Pawar) साथ सोडत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत एकत्र येत सत्तेत सामील झाले. तेव्हापासून अजित पवारांच्या साथीनं गेलेल्या आमदारांसह अजित पवारांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार असा प्रचार सुरू केला आणि राष्ट्रवादी नेमकी कोणाची हा मुद्दा थेट निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. आज याच प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. आज निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोग तोडगा काढत निकाल देणार की, नवी तारीख देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाचा सविस्तर 

मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याच्या सीमावर्ती भागात दारूबंदी, पोलिसांचा कडक पाहारा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लागू

Madhya Pradesh Election 2023: मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी (Elections 2024) येत्या सतरा आणि अठरा तारखेला मतदान आहे. त्यामुळे या निवडणुका निर्भय आणि निरपेक्ष वातावरणात व्हाव्यात, म्हणून आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशच्या (MP Assembly Election Schedule)  सीमावर्ती भागांत आणि सीमेच्या दोन्ही बाजूंनी पाच किमी अंतरावर बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदी लागू केली आहे. मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांकडून नाकाबंदी करून कडक पहारा देण्यात येत आहे. या परिसरात कुणीही दारू बाळगू नये, अथवा विक्री करू नये, असे स्पष्ट आदेश आज जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. वाचा सविस्तर 

Israel Gaza Attack : युद्धभूमी गाझा बनली निष्पाप चिमुकल्यांची स्मशानभूमी, प्रत्येक दहाव्या मिनिटाला एका बालकाचा मृत्यू

Israel Palestine Attack : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, गाझा पट्टी (Gaza Attack) निरपराधांसाठी स्मशानभूमी (Graveyard) बनली आहे. येथे दर दहा मिनिटांनी एका चिमुकल्याचा (Child Death) मृत्यू होत आहे, तर दोन मुले जखमी होत आहेत. इस्रायल आणि हमास (Israel Hamas Conflict) यांच्यातील युद्धाला एक महिना उलटून गेला आहे. इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Hamas) चा नायनाट करण्याचं पक्कं केलं आहे. त्यामुळे गाझा पट्टी (Gaza Strip) त इस्रायल लष्कराने (Israeli Army) हल्ले तीव्र केले आहेत. वाचा सविस्तर

Nawazuddin Siddiqui : “गोरा होण्यासाठी मी अनेकदा फेअरनेस क्रीम लावायचो”; नवाजुद्दीन सिद्दीकीचा खुलासा

Nawazuddin Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddhin Siddhiqui) हा मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. दर्जेदार अभिनय आणि अभ्यासू अभिनेता ही नवाजुद्दीनची ओळख आहे. नवाज आज लोकप्रिय अभिनेता असला तरी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. अनेकवर्ष अभिनेत्याला वाटायचं की तो चांगला दिसत नाही. अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. गोरा होण्यासाठी अनेकदा फेअरनेस क्रीम लावायचो, असं तो म्हणाला आहे. वाचा सविस्तर 

9 November In History : भारताने जुनागड संस्थान ताब्यात घेतले, बर्लिनची भिंत पाडली, समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांचे निधन; आज इतिहासात

9 November In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आज 9 नोव्हेंबर रोजीदेखील काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर, जनमताला नाकारत पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेणाऱ्या जूनागड संस्थानाचा ताबा आजच्या दिवशी भारताने घेतला. तर, स्त्री शिक्षणाासाठी आणि विधवांच्या उन्नतीसाठी आपलं आयुष्य वेचणारे समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे (Dhondo Keshav Karve) यांचा आज स्मृतीदिन आहे. जर्मनीची फाळणी करणाऱ्या बर्लिनची भिंत आजच्या दिवशी पाडण्यात आली. वाचा सविस्तर 

Horoscope Today 9 November 2023: आजचा दिवस खास! ‘या’ राशींना मिळणार त्यांच्या मेहनतीचं फळ; तुमचं आजचं राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 9 November 2023: राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 9 नोव्हेंबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आज (Horoscope Today) वृषभ राशीचे लोक मानसिक तणावात असतील. वृश्चिक राशीचे लोक बुद्धिच्या जोरावर सर्व कार्य पूर्ण करू शकतील. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊया. वाचा सविस्तर 

[ad_2]

Related posts