एलॉन मस्क लोकांच्या डोक्यात चीप बसवणार; ह्युमन ट्रायलला अमेरिकेची मंजुरी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Elon Musk Neuralink :  ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क ज्या क्षेत्रात पाऊल टाकतात तिथे काही ना काही तरी हटके करतातच. ऍलॉन मस्क यांचा मानवी मेंदुत चीप बसवण्याचा प्रयोग लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.  Elon Musk यांचा स्टार्टअप असलेल्या Neuralink ला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. अवघ्या काही दिवसांत याची ह्युम ट्रायल होणार. एलॉन मस्क यांचा हा आजपर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. 

अमेरिकन एजन्सी FDA ची मंजुरी

इलेक्ट्रिक कार असोत वा हायपरलूप तंत्रज्ञान. मंगळावरील वस्तीसाठी अंतराळ संशोधन असोत वा ट्विटर. ऍलॉन मस्क जे हातात घेतात त्यात काहीतर हटकेपणा करतात. आता मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट तयार केलंय जे संपूर्ण मानवजातीसाठी वरदान ठरु शकतं. ऍलॉन मस्क यांनी एक असं प्रोजेक्ट सुरु केलंय ज्याद्वारे मानवी मेंदुत चीप बसवली जाणार आहे. या चीपद्वारे मनुष्याला नवी ताकद मिळणार आहे. मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीनं 2016 पासूनच मानवी मेंदुत कॉम्प्युटर चीप बसवण्याच्या प्रोजेक्टचं काम सुरु केलं होतं. या प्रोजेक्टअंतर्गत मानवी परीक्षण करण्यासाठी अमेरिकन फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशनकडून मंजुरी मिळाली आहे.

ऑपरेशन करुन डोक्यात चीप बसवणार

Neuralink च्या क्लिनिकल ट्रायल अंतर्गत, मेंदू संगणक इंटरफेस (BCI) शस्त्रक्रियेद्वारे मानवी मेंदूच्या जवळ चीप प्रत्यारोपित केली जाणार आहे. यानंतर चिपच्या हालचालीचे निरीक्षण केले जाणार आहे. यानंतर संगणाकाच्या मदतीने मानवी डोक्यात बसवलेली ही चीप कंटोल केली जाणार आहे.  

अशी होणार ह्युमन ट्रायल

हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातल्या लोकांनी न्यूरालिंकमध्ये काम करावं, असं आवाहन एलन मस्क यांनी केले होते. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर आता Neuralink प्रत्यक्षात मानवावर याची चाचणी करणार आहे. अनेक लोक या ह्युमन ट्रायसाठी रेडी झाले आहेत. लवकरच हा प्रयोग प्रत्यक्षात सुरु केला जाणार आहे.   2030 पर्यंत 22 हजार लोकांच्या मेंदूमध्ये ही चिप बसवण्याचे उद्दिष्ट Neuralink कंपनीने ठेवले आहे. 

प्रयोग यशस्वी झाल्यास अनेक मानवी विकारांवर मात करणार

मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास अनेक मानवी विकारांवर मात करणं शक्य होईल. अर्धांगवायू, मेंदू विकार, अल्झायमर, पाठीच्या कण्याच्या दुखापती दूर करता येतील. शिवाय स्मृतिभ्रंश, नैराश्य, निद्रानाश या विकारांवरही मात करता येईल, अशी माहिती न्यूरालिंकमधल्या सूत्रांनी दिली.

 

Related posts