Bengaluru Viral Video various weapons like AK-47 and INSAS being dried in the sun News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weapons Dried Viral Video : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील (Bangalore News) उल्लाल येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओमध्ये सर्वात घातक असं एके-47, एसएलआर आणि इन्सास रायफल यांच्यासह विविध महत्त्वाची शस्त्र चक्क उन्हात वाळायला ठेवल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेमकं काय झालं पाहुया…

उन्हात हत्यारं का ठेवली?

बेंगळुरूजवळील उल्लाल उपनगरात सिटी आर्म्ड रिझर्व्हचे शस्त्रागार आहे. या शस्त्रागारात CAR शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. डीसीपी वेस्ट सीएआरच्या म्हणण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे या शस्त्र डेपोच्या भिंतीचा एक भाग कोसळला होता. त्यात अनेक हत्यारं भिजली. पावसाचं पाणी आणि त्यात वाहून आलेली घाण शस्त्रांमध्ये गेल्याने हत्यारं खराब होण्याची शक्यता होती. शस्त्रे खराब होऊ नयेत म्हणून त्यांना उन्हात वाळवून पुन्हा सर्व्ह केल्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एक दोन नव्हे तर 500 लहान आणि मोठी शस्त्रे, त्याचबरोबर एके-47, एसएलआर रायफल आणि पिस्तूल  उन्हात वाळवून त्यांची सर्व्हिस करण्यात आली आहेत, असं डीसीपी वेस्ट सीएआर यांनी सांगितलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे उन्हात वाळवली जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर  सर्वत्र खळबळ उडाली होती. हत्यारं नेमकी कुठली आहे आणि चौरी झाल्याचं जबाबदारी कोणाची असा सवाल विचारला जात होता. पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता चर्चांना पूर्णविराम लागला आहे. 

आणखी वाचा – Video: निवडणूक प्रचारातच ‘पडले’! रॅलीमध्ये ड्रायव्हरने कचकचून ब्रेक दाबला अन्…

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधून धक्कादायक माहिती समोर आली होती.  उत्तर प्रदेशमधील लाल बिहारी यांनी आता सरकारकडं AK-47 रायफलचा परवाना मागितला होता. यासंदर्भात त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांना पत्रही पाठवलंय. यात त्यांनी लिहिलंय की, जिवंत मृतकांचा दीर्घकाळ लढा सुरू आहे. भ्रष्टाचार आणि फसवणुकीविरुद्धच्या लढ्यामुळं या जिवंत मृतकांच्या संरक्षणासाठी हा परवाना आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर एके 47 ची चर्चा झाली होती.

Related posts