Smartphone Tips And Tricks Google Will Read Your Search Habits And Shows You The Ads

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

How To Remove Ads : दिवसभरात आपण गुगलवर बऱ्याच गोष्टी सर्च करत असतो. त्यानंतर अनेक गोष्टींचा विचारदेखील करतो. मात्र ज्या गोष्टींचा विचार करतो किंवा सर्च करतो तशाच काही जाहिराती तुम्हाला दिसायला लागतात. त्यावेळी मोबाईल आपलं डोकं वाचत तर नसेल ना?, असा प्रश्न पडतो. मात्र होय तुम्ही जे सर्च करता ते गुगल ट्रॅक करत असतो आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींची माहिती घेत असतो. मात्र फोन तुमचा विचार वाचू शकत नाही तर तुमच्या फोनमधील हालचालींवर नजर ठेवत असतो आणि त्यानुसार तुम्हाला जाहिराती दाखवत असतो. मात्र याच जाहिराती पाहून अनेकांना वैताग येतो. याच सतत येणाऱ्या जाहिराती बंद करायच्या असेल तर या टिप्स किंवा सेटींग्ज नक्की  करुन घ्या…

जाहिराती बंद करायच्या असतील तर काय कराल?

-तुमच्या मोबाईलच्या सेटींगमध्ये जाऊन अॅपमध्ये जा.
-त्यानंतर अॅपमध्ये गुगलवर क्लिक करा.
-त्यात तुम्हाला Manage your google account दिसेल.
-त्यात डेटा आणि प्रायव्हसी सिलेक्ट करा. 
-त्यात Personalized Ads ऑप्शन दिसेल.
-या Personalized Ads मध्ये गुगल तुमची कोणती माहिती ट्रॅक करत आहे. याची माहिती मिळेल.
-Personalized Ads ऑप्शनमध्ये  My Ad Center वर क्लिक करा.
-यात कोणत्या संदर्भातील जाहिराती तुम्हाला दाखवल्या जातात याची माहिती मिळते. 
-तुम्हाला ज्या प्रकरच्या जाहिराती नको आहेत त्या जाहिराती तुम्ही बंद करु शकता. 
– परत मॅनेज युवर गुगल अकाउंट या पर्यायावर जा, येथे तुम्हाला लोकांसाठी लिहिलेल्या जाहिराती दिसतील, तुम्ही या पर्यायावर टॅप करताच, तुम्हाला DeleteAdvertising ID वर टॅप करावे लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला जाहिरातींचा त्रास होणार नाही.

मोबाईल मन किंवा डोकं वाचत नाही तर हालचाली ट्रॅक करतो….

अनेकदा मोबाईलवर आपल्यातील अनेक जण विविध गोष्टी सर्च करतात. आपण जर कॉस्मेटीक्स सर्च करत असू तर त्यासंदर्भात विविध प्रॉडक्ट्सच्या जाहिराती दिसत असतात. त्यासोबतच फिटनेससंदर्भात काही पाहिलं तर तेदेखील दिसतं. हे फक्त गुगलसंदर्भात घडत नाही तर सोशल मीडियावरदेखील घडतं. इंस्टाग्रामवर एखाद्या रिल स्टारचे रिल आपण सतत बघत असू तर त्याचेच रिल्स आपल्याला पुन्हा दिसायला सुरुवात होते. याचाच अर्थ मोबाईल आपल्या हालचाली टिपत असतो. 

इतर महत्वाची बातमी-

Rangoli Templates For Diwali : दिवाळीत कामाच्या नादात रांगोळ्यांची चिंताच विसरा, थेट Amazon वरुन अगदी 500 रुपयांच्या आत खरेदी करा रेडिमेट रांगोळी टेम्प्लेट

[ad_2]

Related posts