[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gold Sold : धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी सोने-चांदी (Gold silver) खरेदी करणं शुभ मानले जाते. यामुळेच धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात आतापर्यंत 27 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या विक्रीतही वाढ झाली आहे. आतापर्यंत 3 हजार कोटी रुपयांच्या चांदीची विक्री झाली आहे. सोने चांदी खरेदीसाठी दिल्लीतील चांदनी चौक, दरिबा कलान, माळीवाडा, सदर बाजार, नया बाजार या घाऊक बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत सोन्याच चांदीच्या दरात मोठी वाढ
आज धनत्रयोदशीनिमित्त ,सोन्याच्या बाजारपेठांमध्ये खळबळ पाहायला मिळाली. सोन्या-चांदीची विक्रमी खरेदी होत आहे. अखिल भारतीय ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा म्हणाले की, आज देशभरात सुमारे 30 हजार कोटी रुपयांचा सोने, चांदी आणि इतर वस्तूंचा व्यवसाय झाला आहे. आज सुमारे 27 हजार कोटी रुपयांच्या सोन्याच्या मालाची विक्री झाली. तर चांदीची सुमारे 3 हजार कोटी रुपयांची झाली आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला हा व्यवसाय अंदाजे 25 हजार कोटी रुपयांचा होता. गेल्या वर्षी सोन्याचा भाव 52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर यावेळी सोन्याचा दर हा 62000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दुसरीकडे गेल्या दिवाळीत चांदी 58,000 रुपयांनी विकली गेली होती आणि आता त्याची किंमत 72,000 रुपये किलोवर पोहोचली आहे.
या वस्तूही विकल्या जातात
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, आज धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश, श्री लक्ष्मी, श्री कुबेर यांच्या मूर्ती किंवा चित्रांची खरेदी केली जात आहे. तर या दिवशी वाहने, सोन्या-चांदीचे दागिने, झाडूसह भांडी, स्वयंपाकघरातील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. याशिवाय दिवाळीत दिवा लावण्यासाठी मातीचे दिवे, घर आणि ऑफिस सजावटीचे साहित्य, फर्निशिंग फॅब्रिक, दिवाळी पूजेचे साहित्य खरेदी करणे शुभ मानले जाते.
तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करताना हॉलमार्किंगसारख्या अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जर तुम्ही धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे सोन्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी असते. गर्दीमुळं या दिवशी सोन्याच्या खरेदीबाबत फसवणूक होण्याची शक्यता वाढते. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खरेदीनंतर बिल घ्या. बिल घेण्याचा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही ते विकायला जाल तेव्हा तुम्हाला अडचणी येणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या:
गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दरांत दुप्पट वाढ, यंदा सोनं 60 हजारांवर, पाच वर्षांपूर्वीची किंमत काय?
[ad_2]