[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. दिवाळीनिमित्त रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे.
फटाक्यांबाबतच्या पहिल्या निर्णयात मुंबई उच्च न्यायालयाने संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेतच फटाके फोडण्याचे आदेश दिले होते, मात्र आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यास संध्या. 8 ते रात्री 10 वाजेपर्यंतच परवानगी द्यावी, असे सांगितले.
शाळा, महाविद्यालये, प्रार्थनास्थळ, रुग्णालये आदी भाग हा शांतता झोन म्हणून जाहीर केला आहे. या परिसरात फटाके फोडताना आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक संस्था यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन केले जाणार आहे.
हेही वाचा
मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी वाहनांची चाके धुतली जाणार
BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, ‘इतका’ बोनस जाहीर
[ad_2]