[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आजारपणानंतर थेट अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट दिल्ली दौरा केल्याने (Ajit Pawar On Delhi Tour) चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या ट्वीटने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भेटीवेळी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाली असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र झाला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर आंदोलन सुरू केल्यानंतर राज्यात आंदोलनाचा वणवा पेटला होता. त्या दरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. या आजारपणामुळे अजित पवार जवळपास 15 दिवस सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. त्यानंतर आज अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आज अजित पवार यांनी दिल्ली दौरा केला. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
अमित शाह यांच्या भेटीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील सोबत होते. मागील काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा तापला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे सरकारबद्दलची प्रतिमा चुकीची जात असल्याची चर्चा सुरू होती. त्याशिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आंदोलनाला सामोरे जात असल्याचे चित्र होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारात होते. तर, अजित पवार हेदेखील आजारपणात होते.
कोणत्या मुद्यावर चर्चा? पटेलांचे ट्वीट
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीबाबत माहिती देणारे ट्वीट केले. पटेल यांनी आज अमित शाह यांची आम्ही भेट घेतली. या भेटीच्या निमित्ताने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय, काही चांगल्या चर्चाही झाल्या असल्याचे पटेल यांनी म्हटले. आजच्या या बैठकीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Had a meaningful meeting with Hon’ble Home Minister Shri Amit Shah ji in Delhi, extending warm Diwali wishes. Grateful for the opportunity to pay a courtesy call and share festive joy.@AmitShah@AjitPawarSpeaks @SunilTatkare @mahancpspeaks #DiwaliGreetings pic.twitter.com/UnVLQb53If
— Praful Patel (@praful_patel) November 10, 2023
शरद पवार-अजित पवार यांची भेट
दुपारी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. प्रतापराव पवार यांच्या बाणेरमधील घरी ही भेट झाली. यावेळी पवार कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते. दिवाळी आणि प्रतापराव पवार यांचा वाढदिवस यानिमित्त ही भेट झाल्याचं, शरद पवारांची बहीण सरोज पाटील यांनी सांगितलं.
26 ऑक्टोबरला ला अजित पवार पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या उपस्थित शेवटचा सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते. त्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात नव्हते. त्यानंतर थेट 29 ऑक्टोबरला प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर थेट 15 दिवसांनंतर अजित पवार शरद पवार यांच्या भेटीवेळी कॅमेरात कैद झाले आहेत.
[ad_2]