Jalgaon Sbi Robbery 4 Crore Robbery With Gold Cash Suspended Raigad Psi Involved In Robbery

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जळगाव: स्टेट बँकेत दरोडा घालून तीन कोटी रुपयांचे सोने आणि 17 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा दरोडा उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या घटनेत पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या घटनेला 36 तास उलटून जाण्याच्या आत पोलिसांना या घटनेचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. पोलिसांच्या (Jalgaon SBI Robbery) या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगाव शहरात दोन दिवसापूर्वी कालिका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँक शाखेत दरोडा घालण्यात आला होता. यामध्ये बँक मॅनेजरवर चाकू हल्ला करून 17 लाख रुपयांची रोकड आणि तीन कोटीहून अधिक रुपये किमतीचे सोने लूटण्यात आलं होतं. या गुन्ह्यात  रायगड जिल्ह्यात कर्जत येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना लाच घेतल्याच्या प्रकरणात निलंबित असलेल्या शंकर जासक (PSI involved in SBI Robbery) या  बँकेत स्वच्छ्ता काम करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

या घटनेत पोलिसांनी पाच पथके तयार करून स्वतंत्र तपास यंत्रणा लावली होती. यामध्ये बँकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मनोज सूर्यवंशी यांची चौकशी केली असता त्यात वेळोवेळी तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला नातेवाईक असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक आणि त्याच्या वडिलांनी हा दरोडा घातला असल्याचे सांगितलं. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली. 

तांत्रिक पद्धतीने तपास करत पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील घरी छापेमारी केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरून नेलेल्या सोन्यासह 17 लाखांची रोकड हस्तगत करून त्यांना अटक केली. जळगाव न्यायालयात आज या तिघांना हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना मिळाली. 

news reels reels

बँक दरोडा प्रकरणात बँकेची सुरक्षेबाबतचा निष्क्रियपणाही तितकाच जबाबदार असल्याचं समोर आले आहे. बँकेत जवळपास पाच कोटी रुपयांहून अधिकचे सोने आणि रोकड असा मुद्देमाल असताना बंदुकधारी सुरक्षा कर्मचारी नसणे, सिसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर कोणाच्याही हाती सहज लागेल अशा पद्धतीने समोरच ठेवणे असा हलगर्जीपणा होत असल्याचं स्पष्ट झालं. 

याहून अधिक अशी गंभीर बाब म्हणजे कंत्राटी पद्धतीने काम करणारे स्वच्छ्ता कर्मचारी लॉकरसह सर्वच आर्थिक व्यवहार होत असलेल्या ठिकाणी सहज जाऊन ते हाताळत असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळेच हा दरोडा टाकण्यात दरोडेखोरांना यश मिळाले असल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. 

या घटनेची माहिती मिळताच दरोड्यात सहभागी झालेल्या शंकर जासक या पोलिस उपनिरीक्षकास पोलिस दलातून कायमचे बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

[ad_2]

Related posts