[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs NED, World Cup 2023 : भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या साखळी सामन्यात टीम इंडियात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवलाय. त्याशिवाय नेदरलँड्सच्या संघातही कोणताही बदल करण्यात आला नाही.
विश्वचषकाच्या रणांगणात भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म झालंय. उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार, हेही पक्कं झालंय. पण त्या नॉकआऊट सामन्याच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघाला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. विश्वचषक साखळीतल्या या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे. वन डे क्रिकेटच्या दुनियेत नेदरलँड्स हा कच्चा लिंबू मानला जात असला तरी याच संघानं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला हरवलंय, ते विसरता येणार नाही.
भारतीय संघात बेंगलोरमध्ये अखेरच्या साखळी सामन्यात कोणताही बदल केला नाही. आतापर्यंत साखळी सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाचे कौतुक केलेय. नेदरलँड्सविरोधात भारतीय संघ पुर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. सेमीफायनलआधी भारतीय संघाला सराव करण्याची अखेरची संधी असेल.
टीम इंडियाचे 11 शिलेदार –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज.
CWC 2023. India XI: R Sharma(c), S Gill, V Kohli, S Iyer, KL Rahul (WK), S Yadav, R Jadeja, M Shami, K Yadav, M Siraj, J Bumrah.
https://t.co/jiX03YxcSN #INDvNED #CWC23
— BCCI (@BCCI) November 12, 2023
🚨 Toss Update 🚨#TeamIndia win the toss & elect to bat in Bengaluru and remain unchanged!
Follow the match ▶️ https://t.co/efDilI0KZP#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/CX956WgHiO
— BCCI (@BCCI) November 12, 2023
नेदरलँड्सची प्लेइंग-11
मॅक्स ओ’डॉड, वेस्ली बरासी, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंगलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), बास डी लीडे, तेजा नदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.
भारतानं लागोपाठ आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान तर पटकावलंच, पण विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं पहिलं तिकीटही कन्फर्म केलंय. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणारंय. पण त्या नॉकआऊट सामन्याआधी भारतीय संघाला आणखी एका साखळी सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात भारतासमोर नेदरलँड्सचं आव्हान आहे. वन डे क्रिकेटच्या दुनियेत नेदरलँड्स हा कच्चा लिंबू मानला जात असला तरी विश्वचषकाच्या साखळीत याच संघानं दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसारख्या बलाढ्य संघांना हरवलंय, ते विसरता येणार नाही.
[ad_2]