Weather Update News Imd Today Imd Forecast 12 November 2023 Himachal Pradesh Delhi Air Pollution

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Update: देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस वातावरण थंड राहील. हवामान विभागानं आज (12 नोव्हेंबर)  उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत राजधानी दिल्लीत धुके पडेल. काही ठिकाणी धुके तर दिवसा आकाश पूर्णपणे निरभ्र राहणार आहे. पावसानंतर येथील कमाल तापमान सामान्यपेक्षा सात अंशांनी खाली आले आहे. शनिवारी दिल्लीचे कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 13 अंशांवर नोंदवले गेले आहे. आज राजधानीच्या अनेक भागात AQI 200 च्या वर आहे. शून्य आणि 50 मधील AQI ‘चांगला’ आहे. 51 ते 100 ‘समाधानकारक’ आहे, 101 ते 200 ‘मध्यम’ आहे, 201 ते 300 ‘खराब’ आहे, 301 ते 400 ‘अतिशय गरीब’ आहे. तर 401 ते 450 ‘खराब’ आहे. जेव्हा AQI 450 पेक्षा जास्त होतो, तेव्हा ते ‘अत्यंत गंभीर’ श्रेणी मानले जाते.

उत्तर प्रदेश-उत्तराखंडमधील हवामानाची स्थिती काय? 

उत्तर प्रदेशातही पावसानंतर वातावरण आल्हाददायक आहे. पावसानंतर नागरिकांना प्रदूषणापासून दिलासा मिळाला असून तापमानातही घट झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, लखनौसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंड हवामान अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय आज चमोली, पिथौरागढ आणि बागेश्वरच्या उंच भागात बर्फवृष्टी होऊ शकते. जयपूर हवामान केंद्रानुसार, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, राजस्थानच्या अनेक भागात हलक्या पावसाची नोंद झाली आहे, त्यानंतर तापमानात घट झाली आहे. येत्या काही दिवसांत राजस्थानमध्ये पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, कोकण, पुणे, सातारा या ठिकाणी काही भागात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या:

Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी; दिवाळीच्या दिवसात पुण्यातील वातावरण कसं असेल?

[ad_2]

Related posts