World CUP 2023 : भारतानं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवला, प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भारतानं नेदरलँड्सचा १६० धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला. भारताचा हा नऊ सामन्यांमधला नववा विजय ठरला. या विजयासह रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांना देशवासीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. या सामन्यात भारतानं दिलेल्या ४११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सनं ४७ षटकं आणि पाच चेंडूंत सर्व बाद २५० धावांची मजल मारली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. विराट कोहली आणि रोहित शर्मानंही प्रत्येकी एकेक विकेट घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts