( प्रगत भारत । pragatbharat.com)
Surya Transit In Scorpio: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळी गोचर करतो आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्यदेव सुमारे एक महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलतात. त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण विशेष मानले जाते.
येत्या 17 नोव्हेंबरला सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. वृश्चिक राशीवर मंगळाचे राज्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आणि सूर्य देव यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्याच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
सूर्यदेवाचं गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकणार आहे. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्हाला नवीन नोकरीही मिळू शकते. कामाच्या ठिकाणी उच्च स्तरीय लाभ देखील मिळतील. दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून तुमची सुटका होणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
सूर्य देवाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमच्या आयुष्यात आनंदही येणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात अनेक महत्त्वाचे बदलही दिसू शकतात. तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठीही वेळ अनुकूल राहणार आहे. नशीबही तुमची साथ देणार आहे. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात.
मकर रास (Makar Zodiac)
सूर्य ग्रहाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. सूर्य देव तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या घरात भेट देणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद येऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. तुमचं आरोग्यही चांगलं राहणार आहे. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )