Do not make this mistake with the lamps used in puja on the next day of Diwali Goddess Lakshmi will return from outside the house

( प्रगत भारत । pragatbharat.com)

After Diwali Puja: देशभरात सध्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जातेय. 12 नोव्हेंबर रोजी अनेकांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या रात्री लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जे लोक खऱ्या मनाने आणि भक्तीभावाने पूजा करतात त्यांच्या घरी वास करतात. या दिवशी देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश झाल्यामुळे व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. 

दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरे दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात. अशी मान्यता आहे की, दिवाळीच्या दिवशी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 12 नोव्हेंबरला रात्री लक्ष्मी आणि धन कुबेर देवांना प्रसन्न करण्यासाठी सर्वांनी घर दिव्यांनी सजवलं होतं. या दिवशी मोहरीच्या तेलाचे दिवे लावण्याची परंपरा आहे. 

मात्र तुम्हाला माहितीये का दिवाळीच्या रात्री लावलेल्या या दिव्यांचं काय करावं, हे तुम्हाला माहिती आहे का? या कामात जराशीही चूक तुमची सर्व मेहनत खराब करू शकते. ही चूक तुम्हाला इतकी महागात पडू शकते की देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

दिवाळीच्या पूजेला लावलेल्या दिव्यांचं नंतर काय करायचं?

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी घराची साफसफाई करताना अनेकदा लोकं रात्रीच्या पुजेला लावलेले दिवे घराबाहेर टाकतात किंवा कचराकुंडीत फेकतात. कदाचित तुमच्याकडूनही अशी चूक होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, असं करणं हे अशुभ मानलं जातं. 

ज्योतिष्य शास्त्रात असं मानलं जातं की, पूजेमध्ये वापरण्यात येणारे हे दिवे अशा प्रकारे फेकल्याने देवी लक्ष्मीचा अनादर होतो. असं केल्यावर लक्ष्मी रागावू शकते आणि घरातून कायमचा निघून जाऊ शकते.

अशा वेळी दिवाळीच्या पूजेत वापरण्यात येणारे दिवे, साहित्य इत्यादी एकाच ठिकाणी गोळा करून ठेवा. हे दिवे एकतर झाडाजवळ ठेवा किंवा वाहत्या पाण्यात त्यांना विसर्जित करा. असं केल्याने या वस्तूंची शुद्धता अबाधित राहते. त्याचशिवाय देवी लक्ष्मीही प्रसन्न राहते आणि तिचा घरात वास करते.

दिवाळीच्या पूजेच्या वेळी नवीन लक्ष्मी-गणेश ठेवल्यानंतर लोक घरातील पूजेच्या ठिकाणाहून जुने लक्ष्मी-गणेश देवाऱ्यातून काढून टाकतात. पण शास्त्रामध्ये हे देखील चुकीचं मानण्यात येतं. जुने लक्ष्मी-गणेश आदराने काढून टाकावेत. यासोबतच दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत जुन्या लक्ष्मी गणेशाचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. 

Related posts