ODI ICC World Cup 2023 Ind Vs Ned Wife Anushka Sharma Reaction Getting Viral On Virat Kohli Took Wicket Watch

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anushka Sharma’s Reaction: टीम इंडिया (Team India) आणि नेदरलँड्स (Netherlands) विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या 9 खेळाडूंनी गोलंदाजी केली. टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजांसोबतच, धुवाधार फलंदाजांनीही फलंदाजी करत नेदरलँड्सच्या फलदांजांचा धुव्वा उडवला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट, तर विराट कोहली आणि रोहित शर्मानं प्रत्येकी एक विकेट घेतला. दरम्यान, नेदरलँड्सविरुद्धचा सामना जिंकत टीम इंडियानं यंदाच्या विश्वचषकात सलग नववा सामना आपल्या नावे केला. विश्वचषकाच्या सामन्यात सर्वांच्या कायम लक्षात राहील ते म्हणजे, विराट कोहली आणि रोहित शर्मानं घेतलेल्या विकेट्स. 

टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्सच्या सामन्यात 9 खेळाडूंनी गोलंदाजी केली. महत्त्वाचं म्हणजे, टीम इंडियाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा कणा असलेल्या विराट कोहली कालच्या सामन्यात गोलंदाजी करताना दिसला. रोहित शर्मानं नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी करताना शेवटची विकेट घेत नेदरलँड्सचं आव्हान संपृष्टात आणलं. 11 वर्षांनंतर रोहित शर्मानं गोलंदाजी करताना आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेट घेतला. तर, “विराट कोहली को बॉलिंग दो”, ही चाहत्यांची मागणी मान्य करत रोहितनं विराट कोहलीला गोलंदाजी दिली. विराटनंही रोहितचा मान ठेवत गोलंदाजी केली आणि चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं. कोहलीनं विकेट घेतली. तब्बल 9 वर्षानंतर विराटनं आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेट घेतली. विकेट घेतल्यानंतर विराटसह संपूर्ण टीम इंडियानं मैदानातच सेलिब्रेशन केलं. पण, विराटनं विकेट चटकावताच स्टेडियमधील प्रेक्षक गॅलरीत बसलेली अनुष्काही आनंदानं बहरून गेली. विराटनं विकेट घेतल्यानंतर पत्नी अनुष्कानं जोरदार सेलिब्रेशन केलं.  


अनुष्काचं जोरदार सेलिब्रेशन 

विराट कोहली विश्वचषक 2023 च्या शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध गोलंदाजी करताना दिसला होता. चाहत्यांची मागणी पूर्ण करत रोहित शर्माने चेंडू कोहलीच्या हातात दिला. यापूर्वी स्टँडवर बसलेले चाहते कोहलीला गोलंदाजी करण्याची विनंती करत होते. रोहित शर्माच्या विश्वासावर खरं उतरत कोहलीनं दुसऱ्याच षटकात विकेट घेतली. कोहलीनं घेतलेल्या विकेटनंतर पत्नी अनुष्का शर्मानं केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कोहलीची विकेट घेताच अनुष्का शर्मा आनंदानं बहरून गेली. सामन्याच्या 25व्या षटकात कोहलीनं नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्डसला बाद केलं. इथं मैदानात विराटनं विकेट घेतला आणि पत्नी अनुष्काच्या आनंदाला पारावार उरला नाही. पवेलियनमध्ये बसलेली अनुष्काच्या चेहऱ्यावर तिचा आनंद झळकत होता. तिच्या याच रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील पाचवा विकेट 

विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हा पाचवा विकेट होता. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-20 मध्येही त्यानं 4 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच, कोहलीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हा नववा आंतरराष्ट्रीय विकेट होता. कोहलीनं 9 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेतला. या स्पर्धेच्या आधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीनं हार्दिक पांड्याच्या षटकातील उरलेले तीन चेंडू टाकले होते, त्यानंतरच्या सामन्यांपासूनच चाहते सातत्यानं “विराट कोहली को बॉलिंग दो” अशी विनंती रोहितकडे करत होते. कालच्या सामन्यात रोहित शर्मानं चाहत्यांची मागणी पूर्ण करत कोहलीला बॉलिंग दिली. 

विश्वचषक 2023 मधील सलग नववा विजय 

रोहित शर्माच्या भारतीय संघानं नऊपैकी नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवून, विश्वचषकाच्या साखळीत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला. भारतानं अखेरच्या साखळी सामन्यात तर नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल्सच्या सामन्यासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं.



[ad_2]

Related posts