Murder In Nanded City Killing The Brother Of The Brother Who Killed Brother Crime News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नांदेड: एकीकडे देशभरात मोठ्या आनंदात दिवाळी (Diwali) साजरी केली जात असतांना, तिकडे नांदेड (Nanded) शहर एका खुनाच्या (Murder) घटनेने हादरले असल्याचे पाहायला मिळत आहे. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एमजीएम महाविद्यालय परिसरातील विस्तारित नाथनगर येथे ही घटना घडली. भरत हरिसिंग पवार (रा. विस्तारित नाथनगर, नांदेड) असे मयताचे नाव असून, विश्वास शिंदे असे आरोपीचे नाव आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी विश्वास शिंदे याच्या भावाचा खून भरत पवार याच्या भावाने केला होता. त्यामुळे याचा राग विश्वासच्या मनात होता. तसेच, त्याने आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार, खुनाचा वचपा घेण्यासाठी विश्वास शिंदे सर्वत्र धूमधडाक्यात लक्ष्मीपूजन सुरू असताना भरत पवारच्या घराजवळ पोहचला. तसेच, भरत पवारला त्याच्या घराजवळ आपल्या अन्य दोन साथीदारासह घेरले. त्यानंतर खंजरने भरतवर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर तिघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. 

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी…

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, विमानतळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच खुनाचा थरार 

दिवाळी निमित्ताने राज्यसह देशभरात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यात देखील असाच दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पण, याच नांदेडमध्ये ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच खुनाचा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  एमजीएम महाविद्यालय परिसरातील विस्तारित नाथनगरमध्ये खुनाची घटना घडल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्याने परिसरात काही वेळात खुनाच्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच झालेल्या हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Crime : भर दिवाळीत 12 वर्षाच्या शाळकरी मुलगा आईसह एकाच कुटुंबातील चौघांची हत्या; संशयित फरार

[ad_2]

Related posts