Hyderabad Godown Fire Many People Died Including 2 Women Know All Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hyderabad Fire: दिवाळीच्या (Diwali 2023) मुहूर्तावर हैदराबादमध्ये (Hyderabad) एक मोठी दुर्घटना घडली आहे. दुर्दैवी घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हैदराबाद (TS) येथील केमिकल गोदामाला आग लागून 2 महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली.  

सेंट्रल झोनचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी घटनेसंदर्भात माहिती देताना म्हटलं की, हैदराबाद येथील बाजारघाट (Bazarghat), नामपल्ली (Nampally) येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गोदामाला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. तर 16 जण किरकोळ जखमी होऊन सुखरूप बचावले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांनी नामपल्ली आगीत झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं सर्व उपाययोजना करण्याचं आदेश दिले आहेत. 

आग लागलेल्या इमारतीत रासायनिक पदार्थांचा साठा 

हैदराबाद (TS) च्या नामपल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील एका गोदामात ही घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांसह आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. डीजी (अग्निशमन सेवा) नागी रेड्डी यांनी सांगितलं की, “इमारतीमध्ये केमिकल्सचा बेकायदेशीररीत्या साठा करण्यात आला असावा. इमारतीच्या स्टिल्ट एरियामध्ये केमिकल्सचा साठा करण्यात आला होता आणि या केमिकल्समुळे आग लागली होती. एकूण 21 जणांना बाहेर काढण्यात आलं, त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जणांवर उपचार सुरू आहेत. सर्व लोकांना अपार्टमेंटमधून बाहेर काढण्यात आलं आहे.” 

[ad_2]

Related posts