No Money To Celebrate Diwali Festival Two Young Farmers Commit Suicide In Chhatrapati Sambhaji Nagar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : राज्यसह देशभरात दिवाळीचा (Diwali) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. असे असतानाच ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhaji Nagar) दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) करत आयुष्य संपवलं आहे. गंगापूर तालुक्यातील सावंगी गावातील 38 वर्षीय शेतकऱ्याने नापिकीसह, कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असून, दुसऱ्या घटनेत कन्नड तालुक्यातील गव्हाली तांडा येथील 35 वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. गणेश वसंत पवार (38 वर्ष)  आणि अंकुश हिम्मत चव्हाण (वय 35 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावं आहे. 

गंगापूर तालुक्यातील सावंगी गावात राहणारा अल्पभूधारक शेतकरी गणेश पवार यांच्यावर बँकेचे कर्ज होते. असे असतांना मागील चार वर्षांपासून सतत अतिवृष्टी आणि यंदा कोरडा दुष्काळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बँकेकडून घेण्यात आलेलं कर्ज कसे फेडायचं याची गणेश पवार यांना सतत चिंता होती. त्यामुळे ते नेहमी तणावाखाली असायचे. दरम्यान, शुक्रवारी गणेश यांनी तणावात जेवणही केले नाही. दिवाळी सारखा सण असल्याने खरेदी कशी करायची या मनःस्थितीत शनिवार (11 नोव्हेंबर) रोजी पवार घरातून निघून गेले आणि सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतलेच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी पवार यांचा सर्वत्र शोध घेऊन देखील ते मिळून आले नाही. याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. धक्कादायक म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मार्तंडी नदीजवळील एका शेतात गणेश पवार यांचा मृतदेह आढळून आला. 

स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

दुसऱ्या घटनेत कन्नड तालुक्यातील गव्हाली तांडा येथील 35 वर्षीय अंकुश चव्हाण यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वडिलांच्या नावावर असलेली तीन एकर खडकाळ शेती कसून अंकुश चव्हाण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. याच शेतीवर अकुंश यांच्या वडिलांनी त्यांना ट्रॅक्टर घेऊन दिला होता. सोबतच शेतीसाठी कृषी दुकानदाराकडून उधार बियाणे, खते खरेदी केले होते. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मकाचे पिक पूर्णपणे वाळून गेले. त्यात शेतीसाठी घेतलेलं कर्ज, ट्रॅक्टरचे हप्ते फेडायचे कसे या चिंतेत असलेले अंकुश तणावात होते. त्यामुळे हतबल झालेल्या अकुंशने सोमवारी पहाटे स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ऐन दिवाळीत दोन तरुण शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Farmer Suicide : बँकेचे कर्ज कसे फेडायचे? मराठवाड्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

[ad_2]

Related posts