Smartphone Under 10000 Having Best Camera Samsung Itel Moto G And Xiaomi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Smartphone Under 1000 : स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी फक्त 10 हजार रुपयांचं बजेट आहे का? उत्तम कॅमेरा आणि उत्तम फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टफोन्सची लिस्ट दाखवणार आहोत. येथे आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये येणाऱ्या फोनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही एकापेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ बनवू शकाल. या यादीमध्ये moto G 14 ते Poco C 55 चाही समावेश आहे. या स्मार्टफोन्सची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 50 मेगापिक्सेल किंवा त्यापेक्षा जास्त कॅमेरा मिळत आहे. घरातील आजी आजोबांसाठी तर हे बेस्ट फोन आहेत.

iTel P55 फोन आणि फिचर्स

iTel P55 हा 5G स्मार्टफोन आहे, त्याचे डिझाइन आपल्याला खूप आकर्षक वाटू शकते. या फोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले आहे, फोन मीडियाटेक डायमेंशन 6080 एसओसी चिपसेटसह देण्यात आला आहे. या फोनचा कॅमेरा दिवसाच्या उजेडात उत्तम शॉट्स कॅप्चर करतो. यात तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी मिळते. याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर अॅमेझॉनवर 26 टक्के सवलतीसह केवळ 9,999 रुपयांत मिळत आहे. यामध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 MP आहे. याशिवाय सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 8 MPचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Moto G14 किंमत आणि फिचर्स

Moto G14 हा फोन दीर्घ बॅटरी बॅकअपसह येतो. फोटो आणि व्हिडिओसाठी यात ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आणि सेकंडरी कॅमेरा 2 MP आहे. याच्या फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 MP कॅमेरा देण्यात आला आहे. तुमच्या बजेटमध्ये तुम्ही अॅमेझॉनवरून फक्त 8,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

POCO C55 चा कॅमेरा कसा आहे?

मीडियाटेक हेलियो G 85 प्रोसेसरची किंमत 9,499 रुपये असून तो G85 SoC में 4GB/6GB Ram आणि 64GB/128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. फोटो आणि व्हिडिओसाठी 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती 10 Wवर चार्ज करता येते.

अनेकांना महागड्या मोबाईलमध्ये पैसे खर्च करायचे नसतात. शिवाय घरातल्यांना व्हिडीओ क़ॉल करता यावा यासाठी कमी पैशात चांगल्या फोनचा शोधात अनेकजण असतात. घरातील ज्येष्ठांना फोनच्या फिचर्सबाबत फार काही माहिती नसते. त्यामुळे घरातील ज्येष्ठांसाठी हे तीन फोन बेस्ट ऑप्शन्स आहेत. जर घरातील कोणाला मोबाईल घ्यायला असेल तर आजच घेऊन टाका.

इतर महत्वाची बातमी-

Difference Between Mixer Grinder And Blende : मिक्सर ग्राइंडर आणि ब्लेंडरमध्ये काय फरक आहे, तुमच्या स्वयंपाकघरासाी काय उपयुक्त?

[ad_2]

Related posts