( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral News: सोशल मीडियाच्या (Social Media) नादात चीनमध्ये एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. तरुणाने टिकटॉकचं चिनी व्हर्जन असणाऱ्या Douyin वर लाईव्ह स्ट्रीम करत चिनी व्होडका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Baijiu पिण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. त्याने लाईव्ह करत एकामागोमाग सात बाटल्या संपवल्या होत्या. पण त्यानंतर पुढील 12 तासाच्या आताच त्याला आपला जीव गमवावा लागला असल्याचं वृत्त CNN ने दिलं आहे.
Sanqiange म्हणून ओळखल्या या 34 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करत आपलं आव्हान पूर्ण करण्यास सुरुवात केली होती. 16 मे रोजी रात्री 1 वाजता त्याने लाईव्ह सुरु केलं. या चॅलेंजमध्ये त्याला Baijiu प्यायचं होतं. Baijiu मध्ये 30 ते 60 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल (Alchohol) असतं
“PK चॅलेंजमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एकमेकांशी स्पर्धा करतात. यामध्ये त्यांना युजर्सकडून भेटवस्तू आणि काही रिवॉर्ड्स मिळतात. अनेकदा पराभूत होणाऱ्यांसाठी येथे शिक्षाही असतो. दरम्यान Baijiu पिण्याच्या या स्पर्धेदरम्यान, मी लाईव्ह पाहण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने नेमक्या किती बाटल्या संपवल्या होत्या हे मला समजू शकलं नाही. पण व्हिडीओत नंतर पाहिलं तेव्हा त्याने चौथी बाटली उचलण्याआधी तीन संपवल्याचं दिसत होतं,” अशी माहिती त्याचा मित्र Zhao याने Shangyou News शी बोलताना दिली आहे.
लाईव्ह पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने Baijiu च्या सात बाटल्या संपवल्या होत्या. लाईव्ह संपल्यानंतर पुढील 12 तासाच्या आतच त्याचा मृतदेह आढळला असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.
“त्याच्या कुटुंबाने पाहिलं, तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. त्याला साधे उपचारही मिळू शकले नाहीत,” असं Zhao याने सांगितलं आहे. Shangyou News जास्त मद्यपान केल्यामुळे मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. त्याच दिवशी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
BBC नुसार, Douyin लाइव्ह स्ट्रीम दरम्यान मद्यपान करण्यास परवानगी देत नाही. यासाठी ते चेतावणी देण्यापासून ते वापरकर्त्यांना लाईव्ह स्ट्रीम होणाऱ्या स्पर्धांपासून प्रतिबंधित करणं आणि दंड ठोठावणं अशा अनेक गोष्टी करतात.
या मीडिया इन्फ्लुएन्सरवर याआधीही मद्यपानाच्या कारणास्तव अॅपने बंदी घातली होती. पण त्याने नवे अकाऊंट सुरु केले होते. त्याने याआधीही अनेकदा अशाच प्रकारच्या मद्यपानाच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत अॅपवर ते व्हिडीओ पोस्ट केले होते. त्याच्या मृत्यूमुळे आता अशा अॅप्सच्या सुरक्षा आणि नियमांची चर्चा छेडली आहे.