Jobs In Apple Company Tim Cook Response On How People Can Get A Job At Apple Check 4 Skills Company Looks

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Apple Tim Cook:  तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठ्या कंपन्यांसोबत काम करण्याची संधी हवी आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती कोडिंग, लेखन, सॉफ्टवेअर, डिझाईन वगैरे काही करत असेल तर त्याचे स्वप्न असते की तो एक दिवस गुगल, अॅपल, मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीत काम करेल. स्वप्न नसलं तरी आपल्या वाढीसाठी मोठमोठ्या कंपन्यांसोबत काम करणं सर्वांनाच आवडतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मोबाईल उत्पादक कंपनी अॅपलमध्ये नोकरी कशी मिळवायची? अॅपलचे सीईओ टिम कुक यांना एका पॉडकास्ट मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना टिम कुक काय म्हणाला ते जाणून घ्या.

एखाद्या व्यक्तीकडे असावी ही तीन कौशल्ये 

एखाद्या व्यक्तीमध्ये त्याच्या कंपनीत काम करण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि कुतूहल यासारखी वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे. म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबरच या सर्वांमध्ये ही व्यक्ती प्रथम असावी, असं गायक-गीतकार दुआ लिपा यांनी घेतलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत टिम कुक यांनी सांगितलं आहे.

अॅपल कंपनी कशी काम करते?

अॅपलच्या कर्मचाऱ्यांमध्ये काय साम्य आहे, असे विचारले असता टिम कुक म्हणाले की, ‘एक आणि एक हे तीनच्या बरोबरीचे आहेत, असे त्यांचे मत आहे. हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसे? एका व्यक्तीची कल्पना जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या कल्पनेशी शेअर केली जाते, तेव्हा एक नवीन कल्पना जन्माला येते ज्यात त्यांचे ज्ञान, अनुभव, कौशल्य े या दोन्हींचा समावेश होतो. अॅपलचा प्रत्येक कर्मचारी एक आणि तीन वर काम करतो. म्हणजेच कंपनीसाठी टीम गेम गरजेचा आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

टीमवर्क सगळ्यात महत्वाचं…

टिम म्हणाले की, कंपनी एकमेकांना सहकार्य सर्वात जास्त लक्ष देते. कौशल्यांपैकी सर्वात महत्वाचे कौशल्य सहकार्य आहे. अॅपलने सप्टेंबरमध्ये आयफोन 15 सीरिज लाँच केली होती. या सीरिजअंतर्गत कंपनीने 4 फोन लाँच केले आहेत, त्यापैकी आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लसचे असेंबलिंग यावेळी भारतात केले जात आहे. हे सगळं कर्मचाऱ्यांच्या स्किल्समुळे होत आहे. एकमेकांना सहकार्य करणं आणि सहकार्यांतून नवीन संकल्पनांवर काम करणं, यावर आमचा भर असतो. त्यामुळे आम्ही नवनवीन गोष्टी करण्यात सफल होतो, असंही त्यांनी सांगितलं आहे.

इतर महत्वाची बातमी-

Challan on Helmet : तुमची एक चूक अन् हेल्मेट घालूनही बसू शकतो दंड; तुम्ही गाडी चालवताना ही चूक करता का?

[ad_2]

Related posts