Chhagan Bhujbal On Manoj Jarange : New Caste System Is Coming In The State NCP Leader Said At Pune Mahatma Phule Wada Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : “आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागलीय. ही वर्णव्यवस्था वेगळी, आधीची वेगळी होती . आता लायकी काढली जातेय”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर निशाणा साधला. महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील महात्मा फुले (Mahatma Phule) वाड्यात आयोजित कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. यावेळी छगन भुजबळांनी नागपुरातील दलित तरुणाला  (Nagpur Dalit youth death) झालेल्या मारहाणीवर भाष्य केलं. 

अजूनही लहान-मोठा फरक केला जातो

“रामटेकमधे फक्त दलित आहे म्हणून मारहाण झाली आणि एक मृत्युमुखी पडला. यावरून लक्षात येते की आपल्याला आणखी किती काम करायचे आहे.अजूनही लहान-मोठा हा फरक केला जातो. प्रत्येकाने महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्याबद्दलची पुस्तके वाचली पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची पुस्तके तर वाचलीच पाहिजे”,असं छगन भुजबळ म्हणाले. 

महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शाहू महाराज अशा वेगवेगळया वैचारिक छावण्यांमधील लोकांनी महात्मा फुलेंना गौरवलं.भिडे वाड्याचे काम मार्गी लागेल असं वाटतंय. महात्मा फुलेंच्या या वाड्याच्या आजूबाजूला स्मारक उभारणीसाठी काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्हाला आंदोलन करायला लागणार नाही असं वाटतं.

आता लायकी काढली जातेय

आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागली आहे. ही वर्णव्यवस्था वेगळी,आधीची वेगळी होती. आता लायकी काढली जातेय. काही दिवसांपूर्वी वाटलं होतं की वर्णव्यवस्था संपली. पण उष:काल होता होता काळरात्र झाली.अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.मी कुठल्या समाजाच्या विरोधात नाही. कुठल्याही समाजाच्याविरोधात कोणी असू नाही. सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे.कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे, पण अन्याय होत असेल तर तो सहन देखील केला नाही पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले.  

मनोज जरांगेंनी शब्द मागे घेतला

आरक्षणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. मात्र मनोज जरांगे यांनी लायकी हा शब्द मागे घेतला. 
‘लायकी’ नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं या मनोज जरांगे यांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटले. आंदोलनाचा आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या छगन भुजबळांनी हीच बाब हेरून हिंगोली इथल्या ओबीसी महाएल्गार सभेमध्ये मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली.याच टीकेवरून प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना चिमटा घेत मनोज जरांगे यांनी सल्लागारांचा ऐकू नये असा सल्ला दिला. दरम्यान या शब्दाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आंबेडकरांच्या सल्ल्याचं निमित्त पकडून  जरांगे यांनी सावध भूमिका घेत, भुजबळांचं ऐकून नाही तर प्रकाश आंबेडकरांचा ऐकून आपण लायकी शब्द माघारी घेत असल्याचं जाहीर केलं. 

VIDEO :  छगन भुजबळ यांच्याकडून फुले वाड्याची पाहणी 

 

संबंधित बातम्या  

[ad_2]

Related posts