Challan For Not Wearing Helmet With Properly Tied Strip Check Details Here

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Challan on Helmet : अनेकदा लोकांना योग्य माहिती नसल्याने  (Challan on Helmet)दंडाला सामोरे जावे लागते आणि खिशाला चांगलीच कात्री बसते. डोक्यावर हेल्मेट लावल्यानंतर जसे अनेक बाईक चालकांना वाटते तसे ते आता चालान टाळतील आणि सुरक्षितही राहतील. मात्र फक्त हेल्मेट घालून चालान चुकणार नाही. हेल्मेट घालूनही जर तुमच्यावर चालान बसू शकतो. तुमच्याबाबतीत असे होता कामा नये, म्हणून आम्ही पुढे योग्य ती माहिती देणार आहोत. 

हेल्मेट घालण्याची योग्य पद्धत कोणती?

दुचाकीसाठी स्कूटरचे हेल्मेट घालावे, हे बंधनकारक आहे. जेणेकरून तुमचा खिशातील पैसे वाचेल आणि दुसरं म्हणजे तुम्हीही सुरक्षित राहाल. पण त्यासाठी तुम्ही हेल्मेट घालणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचे हेल्मेट आपल्या डोक्यानुसार फिट व्हावे, घट्ट किंवा सैल नसावे. त्यानंतर ते लावल्यानंतर बेल्ट व्यवस्थित लावावा. जेणेकरून हेल्मेटमुळे तुमच्या डोक्याचे योग्य प्रकारे संरक्षण होईल आणि अपघात वगैरे झाल्यास तुमच्या डोक्याला कमीत कमी इजा होऊ शकेल. जर आपण बेल्ट लावला  नाही तर आपले चालान देखील कापले जाऊ शकते. 

खिशाला कात्री बसेल…

हेल्मेट न घातल्यास आणि बेल्ट नीट न घातल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. ज्यासाठी तुम्हाला मोटार वाहन कायद्यांतर्गत दंड ठोठावला जाऊ शकतो. म्हणजेच दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास तुम्हाला दोन हजार रुपये दंड आणि हेल्मेट नीट घातल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. त्यामुळे हेल्मेट नीट घालणे गरजेचे आहे.  

आयएसआय मार्कचे हेल्मेट घाला…

 
अनेकदा हेल्मेटचा बेल्ट लावून दंड आकारला जातो. कारण तुम्ही घालतेले हेल्मेट भारतीय मानक ब्युरोने (बीएसआय) प्रमाणित केलेले आयएसआय प्रमाणित नसतो. मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट आयएसआय प्रमाणित असणे बंधनकारक आहे आणि तसे न केल्यास तुमचा दंड कापला जाऊ शकतो. ज्याची किंमत 1000 रुपये आहे. तुमच्या गाडीवर किती चालान आहे. ते तुम्ही घरबसल्या पाहू शकता. 

ई-चलान कसं तपासणार?

-हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता.
-यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या ई-चलान वेबसाईटवर जावं लागेल.
 -चेक ऑनलाईन सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Check Challan Status वर क्लिक करा.
-त्यानंतर तिथे तुमच्या वाहनाचा नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकून ई-चलान एसएमएसद्वारे मिळवण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
-जर तुम्हाला कोणताही चालान मेसेज आला नाही तर DL किंवा Vehicle Number चा पर्याय निवडा.
-तिथे विचारलेली माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा
-तुमच्या वाहनाच्या नावे जर एखादं चालान पेंडिंग असेल तर तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील.

इतर महत्वाची बातमी-

Govt Warning For Social Media : Facebook आणि Youtube युजर्स सावधान! ही चूक केल्यास होईल शिक्षा ; सरकारचा इशारा!

[ad_2]

Related posts