Horoscope 29 November 2023 : गुरु पुष्य योगामुळे ‘या’ राशीच्या व्यक्तींना हाती घेतलेल्या कामात यश

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 29 November 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. आज या वर्षातील शेवटचं गुरु पुष्य नक्षत्र योग जुळून आला आहे. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.

मेष (Aries Zodiac) 

आजच्या दिवशी प्रगतीचा योग आहे. मात्र तरीही तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तुमचा हलगर्जीपणा टाळणं लाभाचं ठरेल.

वृषभ (Taurus Zodiac) 

आजच्या दिवशी व्यावसायिकांसाठी चांगला योग आहे. गाडीसाठी खर्चाचं नियोजन करणं फायदेशीर ठरेल. तुमची तब्येत जपा.

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या व्यक्तींनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं फायदेशीर ठरेल. वाहन जपून चालवा. रिअल इस्टेट तसंच आयटीशी संबंधित असलेल्यासाठी प्रगतीचा योग आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

आजच्या दिवशी हाती घेतलेलं कामात तुम्हाला यश मिळवून देईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता दाट आहे. कुटुंबामध्ये मंगलकार्य होतील. 

सिंह (Leo Zodiac) 

तुम्हाला तुमच्या संपत्तीतून पैसे मिळणार आहेत. कदाचित जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. संयम ठेवण्याचा प्रयत्न करा.

कन्या (Virgo Zodiac)  

या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आणि शुभ आहे. तुमच्या घरात एक शुभ कार्य होऊ शकतं. 

तूळ (Libra Zodiac)

आजच्या दिवशी व्यवसायात नवीन प्रकल्पांसाठी चालना मिळेल. गाडी खरेदी करण्याचं नियोजन तुम्ही करु शकता. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)

आजच्या दिवशी तुमची रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. तुम्हाला कामामध्ये मित्रांचं सहकार्य मिळू शकतं. अचानक मोठं काम येऊ शकतं.

धनु (Sagittarius Zodiac)

आजच्या दिवशी तुम्हाला असलेली सर्व काळजी दूर होणार आहे. तुमचा प्रवास यशस्वी होईल. हलगर्जीपणा टाळल्यावर प्रगतीचे मार्ग खुले होतील.

मकर (Capricorn Zodiac)

हुशारीने काम कराल तर तुमचा फायदा होणार आहे. गोड बोलून सर्वांचं सहकार्य मिळवण्यात यशस्वी होणार आहात. आर्थिक आव्हानं हुशारीने हाताळा.

कुंभ (Aquarius Zodiac) 

कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. बोलताना आजच्या दिवशी शब्द जपून वापरा.

मीन (Pisces Zodiac)

तुमच्या आजचा दिवस मजेत जाणार आहे. तुमची तब्येत सुधारण्याची चिन्ह आहेत. अडचणींमधून तुम्ही हुशारीने मार्ग काढण्यात यशस्वी व्हाल. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts