9 डिसेंबरपासून दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये बदल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरून होणारा प्रवाशांचा गोंधळ लक्षात घेता प्रशासनाने एका ओळीत फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फलाट क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. 

रेल्वेच्या ट्विटनुसार पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक तेच राहणार असून मध्य रेल्वेवरील पहिल्या फलाटाला आता आठ क्रमांक मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेपासून एक क्रमांक ते मध्य रेल्वेच्या शेवटच्या फलाटापर्यंत अर्थात दादर टर्मिनसच्या फलाटापर्यंत अनुक्रमानुसार रांगेमध्ये क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील फलाटांचे क्रमांक बदलणार नाहीत. मात्र, मध्य रेल्वेवरील फलाट क्रमांक बदलण्यात येतील.

पश्चिम रेल्वे : १ ते ७

मध्य रेल्वे : ८ ते १५

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील पहिला फलाट आता आठव्या क्रमांकाचा असेल. याच क्रमानुसार पुढील फलाट क्रमांक देण्यात येणार आहेत. दादर टर्मिनसमधील फलाट क्रमांकही याच क्रमात असणार आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील फलाट क्रमांक आठपासून सुरू होणार असून टर्मिनसचा फलाट क्रमांक १५ असा असेल. 

फलाट क्रमांकासह केंद्रीय रेल्वे सूचना प्रणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही त्यानुसार बदल करण्यात येणार आहे. पादचारी पूल आणि दिशादर्शक फलकांवरील क्रमांकही नव्याने देण्यात येतील.


[ad_2]

Related posts