Chhagan Bhujbal Should Resign Radhakrishna Vikhe Patil Statement Maratha Reservation OBC Reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट आपली भूमिका मांडत आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा नवा वाद निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, यावरूनच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थेट भुजबळ यांच्यावर निशाणा साधत त्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आज लोकं त्यांना आदराने बोलतायत, उद्या त्यांच्यावर कारवाईची मागणी करतील असेही विखे म्हणाले. कोल्हापूर दौऱ्यावर असतांना विखे यांनी माध्यमांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना विखे पाटील म्हणाले की,”ओबीसीचा मुद्दापुढे करून आंदोलन सुरू आहे, पण याची गरजच नव्हती. विनाकारण दोन समाजामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा सुरू असलेला वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत, नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे. अन्यथा सरकारमध्ये एक वाच्यता नाही असा मेसेज जातो. तसेच, सरकार बाबतची विश्वासार्हता कमी होते,” असे विखे म्हणाले.

भुजबळांनी राजीनामा द्यावा

तर भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. त्यांच्याकडून अशी अपेक्षा अजिबात नाही. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवरती शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतेही आरक्षण कमी न करता आपण मराठा समाजासाठी आरक्षण द्यायला हवे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. असे असतांना भुजबळ यांना वेगळी भूमिका घेण्याची गरज नसल्याचे देखील विखे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : अत्यंत चाणाक्षपणे आंदोलन हाताळणारे मनोज जरांगे ‘लायकी’वरून बॅकफूटवर

[ad_2]

Related posts