Virat Kohli May Retirement From White Ball ODI And T20 International Cricket Team India Vs South Africa Know King Kohali International Career Record Marathi Sports News Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli in T20I Cricket: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 (ICC ODI World Cup 2023) मध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) सध्या लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतोय. त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) लंडनमध्येच व्हेकेशन एन्जॉय करतोय. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आपल्या घरच्या मैदानावर (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया पहिल्या 3 सामन्यांत 2-1 नं आघाडीवर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजनंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर जाणार आहे. पण त्याआधीही किंग कोहलीच्या एका निर्णयानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोहलीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर व्हाइट बॉल (ODI-T20) सीरिज खेळण्यास नकार दिला आहे. कोहलीच्या या निर्णयामुळे 

किंग कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी20-वनडे सीरिज खेळणार नाही 

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, विराट कोहलीनं व्हाइट ब्लॉलपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कोहलीनं भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) लाही याबाबत माहिती दिली आहे. एकंदरीत मीडिया रिपोर्ट्सनुसार चाहत्यांना वनडे आणि टी20 मध्ये त्यांचा किंग कोहली खेळताना दिसणार नाही, असंच चित्र सध्या दिसतंय. पण, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर किंग कोहली व्हाईट बॉलनं खेळणार की नाही, याबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीनं बीसीसीआय आणि सिलेक्शन कमेटीला सांगितलंय की, तो व्हाईट बॉलनं क्रिकेट खेळण्यासाठी कधीपासून उपलब्ध असले, याबाबत तो स्वतः माहिती देईल. दरम्यान, कोहलीनं यापूर्वीही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 12 महिन्यांमध्ये अनेकदा कोहलीनं कोणत्या ना कोणत्या कारणानं या फॉरमॅटपासून अंतर राखल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं आहे. 

विराट कोहलीनं 10 नोव्हेंबर 2022 रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हा T20 वर्ल्डकपचा सेमीफायनचा सामना होता, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला. त्या सामन्यात कोहलीनं 50 धावांची खेळी केली होती. टी20 वर्ल्डकपच्या सेमीफायनच्या सामन्यानंतर टीम इंडिया आतापर्यंत एकूण 21 टी-20 सामने खेळली आहे. या कालावधीत, ICC T20 क्रमवारीत टॉप-10 संघांमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा संघ देखील टीम इंडियाच आहे. मात्र, या 21 सामन्यांपासून विराट कोहली मात्र लांब असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द (International Cricket Career of Virat Kohli)

  • 111 कसोटी सामने  : 8676 धावा – 29 शतकं 
  • 292 वनडे : 13848 धावा – 50 शतकं 
  • 115 टी20 : 4008 धावा – 1 शतकं

टी20 वर्ल्डकप खेळणार की नाही? सस्पेंस कायम (Virat Kohli Will Not Play T20 World Cup?)

आता जेव्हा वनडे वर्ल्डकपनंतर भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची होती, तेव्हाही कोहली आणि रोहितसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण आता कोहलीनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 आणि वनडे फॉरमॅट खेळण्यास नकार दिला आहे. पुढील वर्षी जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे, या वर्ल्डकपमध्ये तरी कोहली खेळणार की, वर्ल्डकप खेळण्यासही नकार देणार? याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे. 

अशा परिस्थितीत कोहलीनं काहीही न बोलता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून स्वतःला दूर केल्याचं बोललं जात आहे. कोहली आणि रोहितसह काही वरिष्ठ खेळाडूंना पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये संधी दिली जाणार नसल्याचा दावाही केला जात आहे. यामध्ये फक्त युवा खेळाडूंनाच खेळण्याची संधी दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीनं निर्णय घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

असं अंदाज वर्तवला जात आहे की, विराट कोहलीला नवडे आणि कसोटी सामन्यांवर आपलं लक्ष केंद्रीय करायचं आहे. यामुळे त्याला टेस्ट चॅम्पियनशिप आणि पुढच्या वनडे वर्ल्डकपसाठीही उत्तम संधी मिळू शकते. आत्तापर्यंत कोहलीनं भारतीय क्रिकेट संघासाठी 115 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 52.73 च्या उत्कृष्ट सरासरीनं 4008 धावा केल्या आहेत. सध्या कोहली आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

पुन्हा कधी व्हाईट बॉलनं खेळणार किंग कोहली? 

आफ्रिका दौऱ्यानंतरही कोहली व्हाईट बॉलनं क्रिकेट खेळताना कधी दिसणार किंवा खेळणार की नाही? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीनं बीसीसीआय आणि सिलेक्शन कमिटीला सांगितलं आहे की, तो व्हाईट बॉलनं खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेटसाठी कधी उपलब्ध होईल? याची माहिती तो स्वत: देईल. अशा परिस्थितीत कोहलीनं व्हाईट बॉलच्या क्रिकेटपासून स्वतःला दूर ठेवायला सुरुवात केली आहे, यावरुन त्याच्या निवृत्तीबाबत अंदाजही चाहत्यांनी लावायला सुरुवात केली आहे. 

[ad_2]

Related posts