‘…तर गाठ आमच्याशी’; केदारनाथ Gold Scam प्रकरणी मंदिर प्रशासन समितीकडून कठोर इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kedarnath Gold Scam : सध्या सुरु असणाऱ्या चारधाम (Chardham Yatra) यात्रेमध्ये एकिकडे भाविकांचा ओघ वाढत असतानाच दुसरीकडे मात्र केदारनाथ मंदिरासंबंधीची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जी पाहता अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. केदारनाथ धाम मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याऐवजी पितळ लावल्याच्या आरोपांमुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि साशंक वातावरण पाहता श्री बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समितीनं हे एक षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

यात्रेवर वाईट परिणाम करत आणि मंदिर परिसर, प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतून ही चुकीची माहिती पसरवली जात असल्याची प्रतिक्रिया मंदिर प्रशासन समितीनं दिली. इतक्यावरच न थांबता सोशल मीडियावर सदर प्रकरणाची चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराही देण्यात आला आहे. 

श्रद्धास्थळांवरही राजकारणाचा शिरकाव? 

गाभाऱ्यावा सुवर्ण झळाळी देण्यात आल्यानंतर सोशल मीजियावर सुरु असणाऱ्या या सर्व नकारात्मक चर्चा पाहता हा केवळ बनाव असल्याचं ठाम मत मंदिर समितीकडून मांडण्यात आलं. चारधाम आणि त्यातही केदारनाथ मंदिरामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असून, काही राजकीय घटकांना मात्र हे रुचत नसल्यामुळं यात्रा नकारात्मक मार्गानं प्रभावित करण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती पसरवल्याला खळबळजनक खुलासा मंदिराच्या प्रशासकिय समितीनं केला. 

राज्य शासनाच्या परवानगीनंतरच… 

मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सोनं नेमकं कोणी लावलं? या प्रश्नाचं उत्तर देत दान करणाऱ्या व्यक्तीनं मंदिरातील गाभाऱ्यात सोनं लावण्याची इच्छा व्यक्त केली ज्यानंतर मंदिर समितीच्या नियमांनुसार त्यांना असं करण्याची परवानगी देत त्यानंतर राज्य शासनानंही यासाठी परवानगी दिल्याचं समितीनं सांगितलं. 

सदरील प्रक्रियेमध्ये दान करणाऱ्या व्यक्तीनं स्वत:च्याच सोनाराकडून तांब्याच्या प्लेट्सवर सोन्याचा मुलामा लावून घेत त्यांच्याकडूनच ते मंदिरात लावण्यात आलं. किंबहुना सोनं आणि तांब्याच्या या प्लेटची अधिकृत बिलंही त्यांनी समितीकडे सुपूर्द करत त्यांचीही नोंद ठेवण्यात आल्याचं समितीनं सांगितलं आणि या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. 

अब्जोंचा घोटाळा? 

समितीनं दिलेल्या माहितीनुसार सध्या मंदिराच्या गाभाऱ्यात 23,777.800 ग्राम इतकं सोनं लावण्यात असून, सध्याच्या घडीला त्याची किंमत 14.38 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या तांब्याच्या प्लेट्सचं वजन 1,001.300 किलोग्राम असून, त्यांची किंमत 29 लाख रुपये इतकी असून, आतापर्यंत हा एकूण खर्च 15 कोटींच्या घरात आहे. इतकंच नव्हे, तर ज्या व्यक्तीनं केदारनाथ मंदिराला सुवर्णझळाळी दिली त्याच व्यक्तीनं 2005 मध्ये बद्रीनाथ मंदिराचंही रुपडं पालटत गाभाऱ्याला सुवर्ण झळाळी दिली होती. 

 

Related posts