Gandhi Peace Award To Gita Press Of Gorakhpur, Prime Minister Narendra Modi Congratulated

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

गोरखपूरच्या गीता प्रेसला  (Gita Press Gorakhpur) गांधी शांतता पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले . शांतता आणि सामाजिक सौहार्दाच्या गांधीवादी आदर्शांचा पुरस्कार केल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने केला पुरस्कार जाहीर. गीता प्रेस 100  वर्षे जुनी आहे. पुरस्कार  मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अभिनंदन केले. 

2021 सालचा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूर प्रेसला देण्यत आला आहे. “गीता प्रेसने गेल्या 100 वर्षांत लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. गीता प्रेस, गोरखपूरला 2021चा गांधी शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. 

सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शांतता आणि सामाजिक ससौहार्दाच्या गांधीवादी आदर्शांचा पुरस्कार केल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने पुरस्कार जाहीर केला.  गीता प्रेसच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, संस्थेने समाजसेवेत केलेल्या कार्याची ओळख आहे.

 

जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक

गीता प्रेस 1923 मध्ये सुरू करण्यात आली आणि जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. गीता प्रेसने 14 भाषांमध्ये 417 दशलक्ष पुस्तके प्रकाशित केली आहे. गीता प्रेसने श्रीमद् भगवद्गीतेच्या 162.1 दशलक्ष प्रतींचा समावेश आहे. गांधी शांतता पुरस्कार हा 1995 मध्ये महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीनिमित्त गांधींनी मांडलेल्या आदर्शांचा सन्मान करण्यासाठी देण्यात येतो. 

पुरस्काराचे स्वरुप 

मंत्रालयाने म्हटले आहे की हा पुरस्कार कोणत्याही व्यक्तीला त्याचे राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात, पंथ किंवा लिंग विचारात न घेता दिला जातो.  एक कोटी रुपये, सन्मानपत्र, प्रशस्तीपत्रक आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला/हातमाग वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंत हा पुरस्कार सुलतान काबूस बिन सैद अल सैद, ओमान (2019) आणि बंगबंधू शेख मुजीबुर रहमान, बांगलादेश (2020) यांना देण्यात आला आहे.  

हे ही वाचा :                            

 



[ad_2]

Related posts