( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 23 May 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी करिअरच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी म्हणून सातत्यानं विचार करणार आहात. चांगल्या संधी तुमच्या प्रतिक्षेत आहेत.
वृषभ (Taurus)
आजच्या अडचणींना मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरं जावा. अधिक प्रयत्न केल्यास तुम्हाला यश मिळू शकेल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहेत. इतरांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागणार आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. अचानक आर्थिक लाभ घडण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo)
आजचा दिवशी अतिरिक्त ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नये.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. शारिरिक व्याधीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी मोठे व्यवहार टाळावेत. शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी पेचप्रसंगात अडकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच एखाद्या प्रकरणात मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी विपरित घटनेतून लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील अडचणी दूर होणार आहेत. फायदेशीर दिवस राहण्याची शक्यता आहे.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होणार आहे. व्यापारात आकस्मिक धनलाभ होऊ शकतो.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी महत्त्वाची कामे पूर्ण करण्यावर पहिला भर द्यावा. वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने काही आनंदाच्या घटना घडतील.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी कामानिमित्त घरापासून दूर जावं लागणार आहे. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नये. तसंच आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होऊ शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)