Head Coach Rahul Dravid Clarified Not Yet Formalised Any Paperwork With Bcci Duration Of His Contract Extension With Team India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Dravid : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी (Rahul Dravid remain Team India Head Coach) कार्यकाळ वाढवण्याच्या वृत्तावर सनसनाटी खुलासा केला आहे. ‘मी अद्याप बीसीसीआयच्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली नाही, अशी प्रतिक्रिया आज (30 नोव्हेंबर) बीसीसीआयच्या आढावा बैठकीनंतर राहुल द्रविड यांनी दिली. कागदपत्रे मिळाल्यावर मी बघेन, असेही त्यांनी नमूद केले. 

दुसरीकडे, काल (29 नोव्हेंबर) बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांबाबत सुरू असलेला सस्पेन्स संपवला होता.  विश्वचषक 2023 पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे भविष्यातही मुख्य प्रशिक्षकपदी राहतील. द्रविड यांच्यासह टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसाठी (वरिष्ठ पुरुष) करार वाढवण्यात आला आहे. मात्र, कराराचा कालावधी किती असेल याबाबत बीसीसीआयने अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नव्हतं. त्यामुळे आता द्रविड यांनी केलेल्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर संभ्रम निर्माण झाला आहे. 

नेहराकडून नकार 

दरम्यान, आशिष नेहराला बीसीसीआय भारतीय T-20 संघाचे प्रशिक्षक बनवू इच्छित होते, परंतु नेहराने भारतीय T-20 संघाचे प्रशिक्षक बनण्यास नकार दिला आहे. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही संभ्रम

द्रविड यांच्या विधानामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर प्रशिक्षक होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. द्रविड यांचा कार्यकाळ विश्वचषक फायनलने संपला आहे. यापूर्वी असे मानले जात होते की द्रविड यांचा कार्यकाळ वाढवला जाणार नाही. बदल्यात व्हीव्हीएस लक्ष्मण यांना  दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून पाठवले जाऊ शकते, अशी चर्चा होती.  टीम इंडिया 10 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे.

द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने आशिया कप जिंकला

द्रविड यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. फायनलमधील ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव वगळता टीम इंडियाने वर्ल्डकपमधील सर्व सामने जिंकले. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी टीम इंडियाने आशिया कप जिंकला. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमीफायनल गाठली होती.

याशिवाय ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका आणि बांगलादेशातील मालिका जिंकली. त्याचबरोबर वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात टी-20 मालिका जिंकण्यातही टीम इंडियाला यश आले. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय इंग्लंडमधील पाचव्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts