[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Narayana Murthy : देशातील आयटी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती (infosys co founder Narayana Murthy) आठवड्यातून 70 तास काम करण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एका नव्या वक्तव्याने नारायण मूर्ती चर्चेत आले आहेत. काहीही फुकट देऊ नये असे वक्तव्य नारायण मूर्ती यांनी केलं आहे. बंगळुरु येथील टेक समिट 2023 च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान, हे वक्तव्य त्यांनी का केलं याच कारणही त्यांनी सांगितले आहे. मी मोफत सेवांच्या विरोधात नाही, परंतु जे लोक सरकारद्वारे प्रदान केलेल्या सेवा आणि अनुदानांचा लाभ घेतात त्यांनी समाजाच्या भल्यासाठी योगदान दिले पाहिजे असे नारायण मूर्ती म्हणाले.
इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी कोणत्याही प्रकारच्या सेवा मोफत देण्याबाबत बोलताना सांगितले की, मी मोफत सेवांच्या विरोधात नाही. परंतू ज्या लोकांना सरकारकडून सेवा आणि अनुदान दिले जाते त्यांनी समाजाच्या भल्यासाठी काम करावे असे नारायण मूर्ती म्हणाले.
मी देखील गरीब कुटुंबातून आलोय
‘मी देखील गरीब कुटुंबातून आलो असल्याचे नारायण मूर्ती म्हणाले. झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी आयोजित केलेल्या ‘फायरसाइड चॅट’ दरम्यान मोफत सेवांबाबत हे विधान केले आहे. स्वतःचे उदाहरण देताना ते म्हणाले की मी मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही, कारण मी देखील एकेकाळी गरीब पार्श्वभूमीतून आलो होतो, परंतु मला वाटते की ज्यांनी मोफत सबसिडी घेतली आहे त्यांच्याकडून आपण त्या बदल्यात काहीतरी अपेक्षा केली पाहिजे. त्यांच्या भावी पिढ्यांना, त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना चांगले शिक्षण घेण्याच्या दृष्टीने उत्तम काम केले पाहिजे.
गरिबी दूर करण्यासाठी दिलेला उपाय
उद्योगपती नारायण मूर्ती यांनी कार्यक्रमादरम्यान आणखी उदाहरणे दिली आहेत. तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला मोफत वीज द्यावी, तर खूप छान होईल. परंतु आम्हाला प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमधील उपस्थिती 20 टक्क्यांपर्यंत वाढवायची आहे, तरच आम्ही तुम्हाला मोफत वीज देऊ असे नारायण मूर्ती म्हणाले. यासोबतच गरिबी हटवण्याच्या प्रयत्नांबाबत ते म्हणाले की, कोणत्याही देशासाठी मुक्त बाजार आणि उद्योजकता या दुहेरी आधारस्तंभांवर आधारित भांडवलशाही हाच गरिबीची समस्या दूर करण्याचा एकमेव उपाय असल्याचे ते म्हणाले.
चीनचा अभ्यास करण्यासाठी सल्ला
भारतातील दरडोई सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढवण्याबाबत त्यांनी सरकारला केलेल्या सूचनेबद्दल कार्यक्रमात विचारले असता, मूर्ती म्हणाले की, राजकीय नेत्यांनी चीनचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. चीनचा जीडीपी भारताच्या पाच ते सहा पट आहे. त्यामुळे मी आमच्या राजकीय नेत्यांना विनंती करेन की त्यांनी चीनचा काळजीपूर्वक अभ्यास करावा असे नारायण मूर्ती म्हणाले. तिथे कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आपण शिकू आणि अंमलात आणू शकू ते पाहा, जेणेकरून भारत देखील चीनप्रमाणे प्रगती करू शकेल. आपल्या लोकांची गरिबी कमी करणारा देश बनू शकेल. देशातील तरुणांना सुधारण्यासाठी अधिकाधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्थापन करण्यासाठी, 3 शिफ्टमध्ये काम करण्यासाठी आणि चीनशी स्पर्धा करण्यासाठी त्वरित निर्णय घेण्यासही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
Narayana Murthy : नारायण मूर्तींचा नवा फॉर्म्युला, तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला
[ad_2]