Ms Dhoni Virat Kohli Sachin Tendulkar Price In First Edition Of Ipl And Know Interesting Fact IPL 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2008 Facts & Tales : आयपीएलचा सोळावा हंगाम सध्या ऐन रंगात आलाय. फक्त नऊ सामने बाकी आहेत… पण अद्याप प्लेऑफसाठी एकही संघ पात्र ठरला नाही. त्यामुळे रंजकता आणखी वाढली आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली आहे. लिलावात महागडे ठरणारे खेळाडू मैदानावर मात्र फ्लॉप गेल्याचे दिसले. आयपीएलचा सोळावा हंगामचा अखेरचा सामना 28 मे रोजी होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या वहिल्या चषकावर शेन वॉर्नच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने नाव कोरले होते. पण तुम्हाला माहितेय का? या पहिल्या हंगामात सचिन, धोनी, विराट, पाँटिंग यासारख्या खेळाडूंना किती पैसे मिळाले होते. पाहूयात पहिल्या हंगामात दिग्गज खेळाडूंना किती रक्कम मिळाली होती. 

एमएस धोनीवर पैशांचा पाऊस-

आयपीएल 2008 च्या लिलावात चेन्नईने धोनीला खरेदी केले होते. चेन्नईने एमएस धोनी याला 9.5 कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले होते. तेव्हापासून धोनी चेन्नईच्या संघाचा सदस्य आहे. 2016-2017 हंगामात चेन्नईवर बंदी घालण्यात आली होती.. तेव्हा धोनी इतर संघाकडून खेळला होता. पण तुम्हाला माहितेय का, विराट कोहलीला 2008 मध्ये आरसीबीने 20 लाख रुपयांत खरेदी केले होते. तेव्हापासून विराट कोहली आरसीबीचा सदस्य आहे. 16 हंगाम एकाच संघाकडून खेळणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. विराट कोहली, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, मनिष पांडे पहिल्या आयपीएलपासून अद्याप आयपीएलमध्ये खेळत आहेत. पण यामध्ये विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे, जो एकाच संघाकडून खेळत आहे. 

सचिन तेंडुलकरला किती रुपयांत घेतले होते मुंबईने ?

2008 च्या लिलावात सचिन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 8 कोटी रुपयांत खर्च केले. पहिल्या हंगामात सचिन तेंडुलकर आयकॉन प्लेअर होता. आयपीएलच्या पहिल्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ग्लेन मॅकग्राथ याला एक कोटी 71 लाख रुपये मिळालेत. दिल्ली डेअरडेव्हिल्सने मॅकग्राथला आपल्या ताफ्यात घेतले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याला एक कोटी 60 लाख रुपये मिळाले होते. पहिल्या हंगामात रिकी पाँटिंग कोलकाता संघाचा भाग होता.. त्यानंतर रिकी पाँटिंग मुंबई संघाकडून खेळलाय.



[ad_2]

Related posts