Aditya Mangal Yoga will be made in the month of December Sun Mars alliance will bring wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Auspicious Aditya Mangal Yog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये अनेक शुभ आणि राजयोग तयार होताना दिसतायत. यामध्ये आदित्य मंगल राजयोगाचाही समावेश आहे. 

बुध ग्रहाच्या राशीमध्ये आदित्य मंगळ राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग सूर्य आणि मंगळ एकत्रितपणे तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया आदित्य मंगल राजयोगामुळे कोणाच्या नशीबाला कलाटणी मिळणार आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

आदित्य मंगल राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. . तसेच, 2024 वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली असेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. बुद्धीच्या मदतीने तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. करिअर उजळण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकतं.

सिंह रास (Leo Zodiac)

आदित्य मंगल राजयोगाच्या निर्मितीमुळे सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा राजयोग तुमच्या राशीतून पाचव्या भावात तयार होणार आहे. या काळात जर तुमचं प्रेमप्रकरण सुरु असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्यात यश मिळू शकते. जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. अडकलेले किंवा रोखलेले पैसे परत मिळू शकतात. 

मेष रास (Aries Zodiac)

आदित्य मंगल योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी नशीब तुम्हाला साथ देणार आहे. 2024 च्या सुरुवातीला तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. तुम्हाला तुमचे करिअर उजळण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. शेअर्समध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts