We Are Committed To Thought Not Opportunistic Direct Attack On Ajit Pawar In Few Words Of Sharad Pawar In Pune Ncp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) बाहेर गेलेल्यांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. लोकांकडे गेल्यानंतर प्रश्न विचारतील म्हणून आपल्यावर हल्ले करा आणि मुळ मुद्यांवर दुर्लक्ष करा, असा प्रकार सुरु आहे. त्यामुळे फारसा विचार करण्याची गरज नाही, आम्ही विचारांशी बांधिल आहोत, संधीसाधू नाही, अशा मोजक्याच शब्दात शरद पवार (Sharad Pawar on Ajit Pawar) यांनी अजित पवारांवर तोफ डागली. 

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शिबिरात बोलताना शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठी चार जागाही घोषित केल्या आहेत. यामुळे आरोपांना आणि अजित पवार गटाच्या भूमिकेवर शरद पवार काय उत्तर देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. शरद पवार यांनी पुण्यात बोलताना अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तुमचा कार्यक्रम काय होता, तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं होतं आणि आता कुणासोबत गेला आहात, अशी प्रश्न लोक विचारणार, म्हणून आमच्यावर हल्ला करत आहेत, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. 

भीती बाळगण्याचे काही कारण नाही, संघटना स्वच्छ झाली (Sharad Pawar on Ajit Pawar)

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सामान्य लोकांमध्ये भूमिका मांडण्याची गरज आहे. भीती बाळगण्याचे काही कारण नाही. जे काही घडलं त्याची चिंता करण्याची गरज नाही, उलट संघटना स्वच्छ झाली नवीन लोकांना संधी मिळाली आहे. विधानसभा जाहीर होतील तेव्हा राष्ट्रवादीची नवी फळी तयार होणार आहे, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

 नवी फळी तयार करण्याची तुमच्यात क्षमता (Sharad Pawar on Ajit Pawar)

शरद पवार यांनी सांगितले की, तुम्हा सर्वांना नवीन संधी मिळाली आहे. विचार शेवटपर्यंत पोहचवण्याचे काम करूया.  नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याची तुमच्यात क्षमता आहे. काही लोकानी नवे प्रश्न तयार केले आहेत, टीका केली.  त्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज नाही. जेव्हा लोकांमध्ये जाणार तेव्हा काही प्रश्न लोकं विचारणार म्हणून ते आज बोलत आहेत. सत्ता येते आणि जाते, सामान्य लोकांचा पाठिंबा महत्वाचा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts