Bangladesh Defeated New Zealand Bangladesh Climbs To Number Two In The WTC Points Table India Australia England Rohit Sharma Pat Cummins Ben Stokes

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bangladesh Defeated New Zealand : बांगलादेश आणि न्यूझीलंड (Bangladesh Defeated New Zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने 150 धावांनी जिंकला. बांगलादेशचा न्यूझीलंडवर त्यांच्या घरच्या मैदानावरील कसोटीतील हा पहिला विजय आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सिलहटमध्ये खेळला गेला. बांगलादेशने गेल्या 24 महिन्यांत दुसऱ्यांदा न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना जिंकण्यात यश मिळविले आहे. याआधी बांगलादेशने गतवर्षीच्या सुरुवातीला घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला होता. दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.

WTC गुणतालिकेत बांगलादेश थेट दुसऱ्या क्रमांकावर 

WTC गुणतालिकेत सध्या पाकिस्तान प्रथम क्रमांकावर आहे. आता बांगलादेशने न्यूझीलंडची शिकार केल्यानंतर WTC गुणतालिकेत Points Percentage System (PTC) मध्ये आता थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशची टक्केवारी 100 टक्के आहे. भारत 66 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 30 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडचा नंबर आहे. विशेष म्हणजे भारताचे गुण जास्त असूनही बांगलादेशनंतर तिसऱ्या स्थानावर आहे.

टीम इंडिया करणार दक्षिण आफ्रिकेचा दौरा 

दुसरीकडे, टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यात कसोटी सुद्धा खेळणार आहे. भारताला आजवर कधीच दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे या दौऱ्यात इतिहास मोडित काढून प्रथम स्थानावर पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. टीम इंडियाने या दौऱ्यासाठी पूर्ण अनुभवी संघ निवडला आहे. 

दुसरीकडे, शेवटच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 3 विकेट्सची गरज होती. तजामुल इस्लामने दोन गडी बाद केले. बांगलादेशला पाचव्या दिवशी पहिले यश ताजमुल इस्लामला डॅरिल मिशेलच्या गोलंदाजीवर नईम इस्लामकडे झेलबाद करून मिळाले. न्यूझीलंडची आठवी विकेट 132 धावांवर पडली. मिशेलने 120 चेंडूंचा सामना करत 58 धावा केल्या. शेवटच्या दोन विकेट तजामुल इस्लामच्या नावावर होत्या. त्याने आधी टिम सौदीला झाकीर हसनकडे झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सौदीने 24 चेंडूंचा सामना करत 34 धावा केल्या. इस्लामनेही ईश सोधीला झाकीर हसनकरवी झेलबाद करून संघाला विजयाकडे नेले.

न्यूझीलंडला विजयासाठी 218 धावांची गरज होती

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 49 षटकांत 7 गडी गमावून 113 धावा केल्या होत्या. शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 218 धावांची गरज होती. याआधी बांगलादेशने पहिल्या डावात 310 आणि दुसऱ्या डावात 338 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडला पहिल्या डावात केवळ 317 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात किवी संघ केवळ 181 धावा करू शकला. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात कर्णधार नजमुल हुसेन शांतोने शतक झळकावले. त्याने 198 चेंडूत 105 धावांची दमदार खेळी केली. शांतो व्यतिरिक्त मुशफिकुर रहीमने 67 धावांची आणि मेहदी हसन मिराझने 50 धावांची खेळी खेळून संघाला मजबूत स्थितीत आणले. अशा प्रकारे बांगलादेशने दुसऱ्या डावात 338 धावा केल्या आणि न्यूझीलंडला 332 धावांचे लक्ष्य मिळाले.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts