Gk Odisha Balasore Train Accident Know About The Biggest Train Accident Of History On Bagmati River

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Odisha Balasore Train Accident: ओडिशामधील बालासोर येथे शुक्रवारी, म्हणजेच 2 जून 2023 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास एक भीषण रेल्वे अपघात (Odisha Train Accident) झाला. या अपघातात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. कोरोमंडल-शालिमार एक्स्प्रेस नावाची पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली आणि पुढे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले आणि  मागून येत असलेली यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनही रुळावरून घसरलेल्या या डब्यांना धडकली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात सुमारे 288 लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, देशातील मोठ्या रेल्वे अपघातांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. आज रेल्वेच्या इतिहासातील याहून देखील मोठ्या रेल्वे अपघाताविषयी जाणून घेऊया.

भारतातील सर्वात मोठा रेल्वे अपघात

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे अपघात 1981 साली झाला होता. या अपघातात सुमारे 800 जणांना जीव गमवावा लागला. 6 जून 1981 ची गोष्ट आहे, जेव्हा प्रवाशांनी खचाखच भरलेली 9 डब्यांची पॅसेंजर ट्रेन पावसाळ्यात संध्याकाळी मानसीहून सहरसाकडे निघाली होती. 416DN या क्रमांकाची ट्रेन ज्या मार्गाने धावत होती, त्या मार्गावरील बदला घाट आणि धामारा घाट स्थानकादरम्यान बागमती नदी येते. ही पॅसेंजर ट्रेन नदीवर बांधलेल्या पुल क्रमांक-51 वरून जात असताना अचानक ती नदीत पडली. ट्रेनचे शेवटचे 7 डबे ट्रेनपासून वेगळे होऊन नदीत पडले. पावसाळा असताना बागमतीची पाण्याची पातळीही खूप वाढली होती, ऐन पावसाळ्यात वाढलेल्या नदी पातळीमुळे एका झटक्यात रेल्वे नदीत बुडाली.

800 ते 900 लोकांचा झाला होता मृत्यू!

ट्रेनच्या त्या 7 डब्यातील लोकांना वाचवण्यासाठी तिथे कोणीच नव्हते. आसपासचे लोक नदीजवळ पोहोचण्यापूर्वीच शेकडो लोकांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. हा अपघात भारतातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचे म्हटले जात आहे. अपघातानंतर अनेक दिवस शोधमोहीम राबवण्यात आली होती. शोध पथकाने 5 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर नदीतून 200 हून अधिक मृतदेह बाहेर काढले. या अपघातात सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडे सांगतात, तर आजूबाजूचे लोक आणि अनेक प्रसारमाध्यमांनी सांगितल्याप्रमाणे या रेल्वे अपघातात सुमारे 800 ते 900 लोकांचा मृत्यू झाला.

अपघाताचे कारण

या अपघाताची अनेक कारणे सांगितली जात आहेत. काहींचे म्हणणे आहे की, जोरदार वादळामुळे हा अपघात झाला आहे. तर काहींचे म्हणणे आहे की, नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ट्रेनचा अपघात झाला आहे. याशिवाय काही लोक असंही सांगतात की, पुलावर आलेल्या एका गायीला वाचवण्यासाठी लोको पायलटने ट्रेनला अचानक जोरदार ब्रेक लावले, त्यामुळे ट्रेनचे शेवटचे 7 डबे उलटले आणि त्यांनी पूल तुटला आणि ट्रेनचे डबे नदीत पडले.

news reels Reels

हेही वाचा:

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर, मानवी चुकीमुळे घडला अपघात? रेल्वेमंत्री म्हणाले…

[ad_2]

Related posts