Saturn rise set position will give immense wealth to this zodiac sign Become a millionaire in the year 2024

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani Effect On 2024: ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह त्याच्या निश्चित वेळेनुसार, राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनीला प्रचंड महत्त्व देण्यात येतं. शनी न्याय आणि शिक्षा देणारा देव म्हणून देखील ओळखले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची स्थिती बलवान किंवा कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला शुभ आणि अशुभ परिणाम प्राप्त होतात. 

2024 मध्ये स्थितीत बदल करणार शनीदेव

ज्योतिष शास्त्रात, शनीला न्यायाची देवता म्हणून ओळखलं जातं. शनी सध्या कुंभ राशीत विराजमान असून 2024 मध्येच परिस्थिती बदलणार आहे. 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2024 पर्यंत शनी अस्त होणार आहे. तर, शनि 18 मार्च 2024 रोजी शमी ग्रहाचा उदय होणार आहे. जाणन घ्या शनी देवाच्या उदय आणि अस्त स्थितीचा कोणत्या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे.

मेष रास

ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांना 2024 मध्ये शनीच्या स्थितीमुळे विशेष लाभ मिळतील. मेष राशीच्या लोकांवर शनि विशेष कृपा करेल. या काळात तुम्हाला पैसा, उच्च पद आणि सुखसोयी मिळणार आहेत. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. 

वृषभ रास

2024 मध्ये या राशीच्या लोकांना शनीचा उदय होणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल. या संक्रमणामुळे व्यापारी वर्गाला नफाही मिळणार आहे. शनी या राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. करिअरसाठी काळ अनुकूल राहील.

धनु रास

शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळणार आहे. याशिवाय या राशीच्या लोकांना यावेळी नशिबाची साथ मिळणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरीत बदली होऊ शकते. रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल राहणार आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ सुख-समृद्धीने भरलेला असणार आहे. मकर राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नवीन वर्ष या राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. आयात-निर्यातीत गुंतलेले व्यापारी चांगला नफा कमवू शकतात.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts