Man Loses Money Of 61 Lakh In Cyber Fraud Part Time Job Offer Bengaluru On Telegram Cyber Crime News Cyber Fraud Case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bengaluru Cyber Fraud : सायबर गुन्हेगारीमध्ये (Cyber Crime) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सायबर गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी दररोज नवनवीन मार्ग शोधताना दिसत आहेत. आता सायबर फ्रॉडचं (Cyber Fraud) आणखी एक नवं प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीला टेलिग्राम (Telegram) वर पार्ट टाईम जॉबसाठी (Part Time Job) मेसेज (Message) आला आणि त्याच्या खात्यातून लाखो रुपये लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरुमध्ये (Bengaluru) ही घटना घडली असून या व्यक्तीच्या खात्यातून तब्बल 61 लाख रुपये गायब झाल्याची घटना घडली आहे.

टेलिग्रामवर वर पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज

सायबर गुन्हेगाराने या व्यक्तीला गंडा घालण्यासाठी नवा मार्ग शोधला. याची सुरुवात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवरील मेसेजने झाली. बंगळुरुमधील 41 वर्षीय व्यक्तीला पार्ट टाईम कामासाठी टेलिग्रामवर मेसेज आला. या व्यक्तीच्या खात्यावरून सायबर गुन्हेगाराने 61.58 रुपये गायब केले. बंगळुरुमध्ये राहणार उदय उल्लास सोशल मीडियावर शेअर बाजारातील ट्रेंडस आणि स्टॉकबाबत माहिती घ्यायचे. एक दिवस त्यांना पार्ट टाईम जॉब ऑफरचा मेसेज आला. हा त्यांना फसवण्याचा प्लॅन होता.

नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

उदय उल्लासला टेलिग्रामवर पार्ट टाईम नोकरीची ऑफर मिळाली. ऑफर पाठवणारी सायबर गुन्हेगार एक महिला होती. या महिलेने तिचं नाव सुहासिनी असल्याचं सांगितलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पार्ट टाईम जॉबमध्ये व्यक्तीला वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करुन काम करण्यास सांगितलं होतं.

10 हजार रुपयांची पहिली गुंतवणूक

या महिलेने आधी उदयचा विश्वास जिंकला आणि त्याला गुंतवणूक करण्यास सांगितलं. मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळण्याचं आमिष दाखवलं आणि योजनेबद्दल सांगितलं. या महिलेने उदयला सुरुवातीला 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून 20 लाखांपर्यंत कमाई करणयाचं आमिष दाखवलं. 

वेबसाईटवर उदयच्या अकाऊंटमध्ये 20 लाख रुपये आले, पण जेव्हा त्याने ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या महिलेचा खरा खेळ सुरु झाला. स्कॅमरने उदयला सांगितलं की, त्याचा क्रेडिट स्कोर कमी असल्याने त्याला ही रक्कम काढता येणार नाही आणि त्याच्याकडे जास्त पैशांची मागणी केली. यादरम्यान पीडित उदयला एका चॅनलकडून सायबर गुन्ह्याची माहिती मिळाली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तोपर्यंत पीडित उदयच्या खात्यातून 61.58 लाख रक्कम लंपास करण्यात आली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts